शोध प्रत्येकातल्या ‘चार्ली’चा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 05:52 AM2017-12-25T05:52:06+5:302017-12-25T05:57:42+5:30

मिशांची वेगळी स्टाइल, बॉलर हॅट, हातातील लहानशी छडी आणि चालण्याचा एक निराळा अंदाज, यामुळे चार्ली चॅप्लिनने विनोदाच्या जगात आपली एक वेगळीच छाप उमटवली. ज्याने मूक राहूनही आपल्या अप्रतिम हास्यअभिनयाने लोकांना इतके हसवले की जगातील कोणतीही विनोदी मालिका पाहिल्यावर त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. (सर्व छायाचित्रे - सुशिल कदम)

गाला भरभरून हसायला लावणारा हा कलाकार २५ डिसेंबर १९७७ रोजी हे जग सोडून गेला. मात्र आजही मुंबईतील राजन कुमार हा उमदा कलाकार चार्लीच्या वेशात जाऊन प्रत्येकाच्या मनातील ‘चार्ली’चा शोध अविरतपणे घेतो आहे.

बिहारमधील मुंगेर या छोट्याशा गावात राजन कुमार याचा जन्म ५ जानेवारी १९७९ रोजी झाला. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाºया राजन यांनी तरुण वयात नॅशनल स्कूल ड्रामामध्ये शिक्षण घेतले

१७ वर्षे चार्ली चॅप्लिनचे पात्र जगणाºया या अवलियाला या प्रवासाविषयी विचारले असता तो सांगतो की, एका मित्राने नव्या पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनावेळी मायकल जॅक्सनचे पात्र होऊन अभिनय-नृत्य कराल का, अशी विचारणा केली.

२००० सालापासून सुरू झालेला प्रवास अजूनही थांबलेला नाही; धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या मनातील चार्ली चॅप्लिन शोधण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत हे पात्र जगण्याची इच्छा आहे.

चार्ली यांची एक ओळख अशी होती की, लोक फक्त त्यांच्यावर हसत नसत, तर त्यांच्या चालण्या, बोलण्यावर, धावण्यावर, पडण्यावर आणि इतकेच काय तर त्यांच्या रडण्यावरही दिलखुलासपणे हसत असत

जगात असे फारच कमी कलाकार झाले, ज्यांनी स्वत:च्या चेह-यावर दु:ख आणून जगाला मोकळेपणाने हसवले, त्यापैकीच चार्ली एक होते. राजन याने गेली दोन वर्षे चार्ली यांच्या आयुष्यातील सर्व बारकाव्यांचा अभ्यास केला.