Eknath Shinde: अडीच वर्षे का लागली? एकनाथ शिंदेंना अभिनेता राघवनचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 03:01 PM2022-06-23T15:01:05+5:302022-06-23T15:25:53+5:30

सुमीतची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “सुमीत भाऊ खुप वैचारिक प्रश्न मांडला आहे. कदाचित तुम्ही पुढे निवडणूक साठी उभे राहणार असे वाटत आहे.” यावर उत्तर देत सुमीत म्हणाला, “अहो वैचारिक प्रश्न विचारला तर मग राजकारणात कसा जाईन?”

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर संध्याकाळी 'वर्षा' निवासस्थान सोडलं आणि 'मातोश्री' गाठलं.

'वर्षा' सोडत असताना शिवसैनिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. याचाच उल्लेख करत काल पहिल्यांदा सामान्य शिवसैनिकाला वर्षावर प्रवेश मिळाला याचा आनंद असल्याचं सांगत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलं आहे.

या पत्रातून शिवसेनाआमदारांची विशेषत: मुंबईबाहेरील आमदारांच्या मनातील खदखद त्यांनी बोलून दाखवली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता आमदार उघडपणे आपलं मत मांडू लागले आहेत.

राज्यातील घडामोडींवर अनेकजण आपले मत मांडत आहेत. त्यामध्ये, काही सेलिब्रिटीही ट्विटरवरुन मत मांडत आहेत. अभिनेता सुमीत राघवननेही या घडामोडीवर भाष्य केलं आहे.

सुमीत राघवनने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, सुमितने एका वृत्तपत्रिकेतील बातमी शेअर केली आहे. ज्यामध्ये, एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म.वि.आ) तर मग एकनाथ शिंदेसाहेब, तुमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खास करून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे.

तुमच्यासारख्या नेत्याला अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? असा सवाल अभिनेता सुमित राघवन याने विचारला आहे. शिवसेनेसोबत फारकत अडीच वर्षांनीच का घेतली, असं त्यांनी विचारलं आहे.

सुमीतची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “सुमीत भाऊ खुप वैचारिक प्रश्न मांडला आहे. कदाचित तुम्ही पुढे निवडणूक साठी उभे राहणार असे वाटत आहे.” यावर उत्तर देत सुमीत म्हणाला, “अहो वैचारिक प्रश्न विचारला तर मग राजकारणात कसा जाईन?”

दरम्यान, एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांनी एक पत्र लिहून आपली भावना कळवली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या असलेल्या बडव्यांनी आमच्यावर ही वेळ आणल्याचे म्हटले आहे

एकनाथ शिंदे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून वेळोवेळी आपली भूमिका जाहीर केली आहे. तसेच, आमदारांनी कुणीही जबरस्तीने आणलं असून ते स्वखुशीने आले आहेत, असेही त्यांनी म्हटलंय.