आनंद आश्रम, कुटुंब, पोलीस कर्मचारी अन् शिवसैनिक; एकनाथ शिंदेंनी साजरी केली रंगपंचमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 03:46 PM2023-03-07T15:46:46+5:302023-03-07T16:01:42+5:30

एकनाथ शिंदे यांनी आज टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून धर्मवीर आनंद_दिघे यांना विनम्र अभिवादन केले.

सध्या राज्यभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रंगपंचमी साजरी केली.

रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने आज ठाणे येथील निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांच्या साथीने रंग खेळण्याचा आनंद लुटला.

यावेळी एकनाथ शिंदेंसह संपुर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते.

एकनाथ शिंदे यांनी पोलीस कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांसोबतची रंगपंचमी साजरी केली.

एकनाथ शिंदे यांनी आज टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून धर्मवीर आनंद_दिघे यांना विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी त्यांच्या तसबिरीला आदरपूर्वक रंग लावून रंगपंचमी सण सर्वांसह मोठ्या आनंदाने साजरा केला.

एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला.