तरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:37 AM2018-10-24T05:37:54+5:302018-10-24T05:38:10+5:30

एकमेकांशी क्षणात संपर्क साधण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हे सोशल मीडियावरील सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप आहे.

Woman, be careful while keeping DP on WhatsAppApps! | तरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान!

तरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान!

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : एकमेकांशी क्षणात संपर्क साधण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हे सोशल मीडियावरील सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप आहे. मात्र, उपयुक्ततेबरोबरच ते तितकेच धोकादायक ठरत आहे. विशेषत: तरुणी, महिलांना त्यावर आपला फोटो (डीपी) ठेवणे त्रासदायक बनले आहे. कारण ‘गर्लफ्रेंड सर्च फॉर व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ नावाचे एक अ‍ॅप तुमचे मोबाइल क्रमांक अनोळखी व्यक्तींना शेअर करत आहे. याच अ‍ॅपमधून नंबर मिळवत ‘डीपी’ पाहून एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या फेरीवाल्याला सोमवारी रात्री गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १२ ने ताब्यात घेतले.
अनाफ आसिफ अन्सारी (२३, रा. मुदबीनगर, नौपाडा, वांद्रे पूर्व)
असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्सारी हा इलेक्ट्रॉनिक वस्तू घरोघर जाऊन विक्री करण्याचे काम करतो. १४ आॅक्टोबरला कस्तुरबा पोलीस ठाण्यात ३३ वर्षांच्या एका महिलेने तक्रार दाखल केली होती. बोरीवली पूर्वच्या सिद्धार्थनगरमध्ये राहणाºया
या महिलेला अनोळखी व्यक्तीकडून जुलैपासून अश्लील मेसेजेस
येत असल्याचे त्यांचे म्हणणे
होते. मेसेज करणारा त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. त्यानुसार, कस्तुरबा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १२चे प्रभारी सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत गीते आणि त्यांचे पथकही या प्रकरणी चौकशी करत होते.
पीडित महिलेला आलेल्या अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्याचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यात आले. यामध्ये तो वांद्रे
पूर्व परिसरात असल्याची माहिती
गीते यांना मिळाली. मात्र, घरोघरी जाऊन सामान विक्री करत
असल्याने सहजपणे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर स्थानिक खबºयाच्या मदतीने सोमवारी रात्री वांद्रे परिसरातून अन्सारीला अटक करण्यात आली.
>‘डीपी’ पाहून मेसेज पाठवित असे!
अन्सारी याने ‘गर्लफ्रेंड सर्च फॉर व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ नामक अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड केले होते. त्यातून त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या अनेक महिलांचे मोबाइल क्रमांक मिळाले. त्याच्या मदतीने तो त्या तरुणी, महिलांचे व्हॉट्सअ‍ॅप ‘डीपी’ पाहायचा. सुंदर महिला त्याला दिसली की, तिला तो मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी करायचा. अशा प्रकारे त्याने अनेकांना असे मेसेज पाठविले होते. मात्र, त्यांनी त्याचा नंबर ब्लॉक केला, असेही त्याने सांगितले.

Web Title: Woman, be careful while keeping DP on WhatsAppApps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.