सीमोल्लंघन झालेच नाही! दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा यू-टर्न, सत्ता सोडण्यासंदर्भात ठोस भूमिका नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 06:08 PM2017-09-30T18:08:41+5:302017-09-30T22:20:05+5:30

शिवसेनेचा दसरा मेळाव्याला वेळात शिवाजी पार्कवर सुरुवात झाली आहे

What will Uddhav Thackeray say in Dasara rally? Attention to All Speech | सीमोल्लंघन झालेच नाही! दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा यू-टर्न, सत्ता सोडण्यासंदर्भात ठोस भूमिका नाहीच

सीमोल्लंघन झालेच नाही! दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा यू-टर्न, सत्ता सोडण्यासंदर्भात ठोस भूमिका नाहीच

googlenewsNext

मुंबई - 'होय आम्ही सत्तेतही आणि विरोधातही', असे दसरा मेळाव्यात सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ता त्याग करण्यावरुन यू-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नोटाबंदी, जीएसटी, काश्मीर प्रश्न, बुलेट ट्रेन, हिंदुत्त्व इत्यादी मुद्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला. मात्र सत्ता सोडण्यासंदर्भात कोणतीही ठोस अशी भूमिका जाहीर केली नाही. 

सत्तेतील सोडण्यासंदर्भात नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

अशा अनेक लाटा आम्ही आमच्या छातीवर घेतल्या आहेत. ही लाट होती, आता गेली. पण एक तुम्हाला मी सांगतो शिवसेना ही मर्दाची औलांदा आहे. लाटेमध्ये वाहत जातो त्याला ओंडका म्हणतात आणि लाट फोडून पोहून जातो त्याला सावरकरांसारखा वीर म्हणतात. आमची वीराची औलांद आहे म्हणून आमच्या सहनशीलतेचा जास्त अंत बघू नका. निर्णय जो काही घ्यायचा असेल त्यासाठी मुहूर्ताची वाट बघावी लागणार नाही. ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी निर्णय घेईन - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

गाईला जपायचं, ताईला झोडायचं- BHU विद्यार्थिनी मारहाणीवरुन भाजपावर टीकास्त्र
आमचं हिंदुत्त्व तुमच्यासारखं थोतांड नाही. गाईला जपायचं अन् ताईला फोडायचं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर चौफेर टीका केली. ''आम्हाला शेंडी, जानव्याचं हिंदुत्त्व मान्य नाही. आम्हाला मंदिरात घंटा बडवणारं हिंदुत्त्व मान्य नाही. आमचं हिंदुत्त्व देशाशी निगडीत आहे'', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला हिंदुत्त्वाची व्याख्या स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं आहे.

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीतील मृतांना वाहिली श्रद्धांजली
मुंबईत शिवतीर्थावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील पुलावर शुक्रवारी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी भाषणाआधी हार स्वीकारले नाहीत. त्यांनी भाषणाला सुरुवात करत भाजपला तोफ डागली. दरम्यान , भाषणापूर्वी उपस्थितांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

नोटबंदीचा निर्णय घेऊन देशाचं नुकसान करणारे देशद्रोही नाहीत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, काळा पैसा कमी झालेला नाही, असेही ते म्हणालेत. तर पाकिस्तानप्रमाणे 40 ते 45 रुपयांत पेट्रोल विकलं तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचू, असा टोमणा देखील उद्धव ठाकरेंनी मारला.  देशात कारभाराचा चिखल झाला आहे. केंद्र, राज्यात सत्ता पण सगळीकडे कारभार बेपत्ता असा टोलाही त्यांनी लगावला. हिंदुत्वाची संकल्पना देशात सत्यात उतरवण्यासाठी आम्ही राष्ट्रपतिपदासाठी भागवतांचे नाव सर्वात आधी सूचवले होते. आम्ही भागवतांचा नितांत आदर करतो, असे ते म्हणाले. वंदे मातरम् म्हणणार नाही, हवे तर आम्हाला देशाबाहेर काढा, असे नाकावर टिच्चून सांगणाऱ्यांना काय उत्तर देता. देशप्रेम काय असते ते तुम्ही आम्हाला शिकवू नका, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.

शरद पवारांवरही केली टीका

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसवरही टीका केली. आम्ही पाठिंबा उघडपणे देतो. तुमच्यासारखे अदृश्य हात देत नाहीत. आम्ही सत्तेत रममाण होत नाहीत, तर सत्ता राबवतो, असे त्यांनी ठणकावून सांगितले. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. याआधीही अनेकांनी प्रयत्न केले आणि संपले. तुम्हीही करून बघा, असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले.

चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन रेल्वेमंत्र्यांवर निशाणा
'रेल्वेमंत्री आता बोलायला लागलेत की, पूल प्रशस्त होणार आहेत. हे तुम्हाला आज सुचलं? जिथे जिथे गर्दी होते, तिथले पूल, जिने रुंद करण्यासाठी आपल्याला अक्कल येणार आहे की नाही? एखादी दुर्घटना घडली की, उच्च समिती नेमतात. पण त्या अधिकाऱ्यांना म्हणावं, समिती नेमू नका. तुम्ही त्या जिन्यावरून उतरून दाखवा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी रेल्वेमंत्री पियुष गोएल यांच्यावर निशाणा साधला.

बुलेट ट्रेन हा फुकटचा नागोबा
'कुणी मागितली बुलेट ट्रेन? मग हा सगळा खटाटोप कुणासाठी? तमाम माता-भगिनींच्या स्वप्नांचा चुराडा करून तुम्ही चांगली स्वप्न बघता. फुकट नागोबा कशाला हा? हे सगळं फुकट मिळतं म्हणून हे चाळे सुरू आहेत. ज्या जनतेने निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा', अशा शब्दांत विरोध करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला.

 

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे मुद्दे

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा यू-टर्न ! सत्ता सोडण्यासंदर्भात ठोस भूमिका नाहीच 
निर्णय घेण्यासाठी मला मुहूर्ताची गरज नाही - उद्धव ठाकरे 

महागाईवरुन भाजपावर उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

हिंदूंचा विश्वासघात करू नका, मराठी लोकांमध्ये फूट पाडू नका - उद्धव ठाकरे 

ग्रामीण भागात बिल भरलं नाही तर कारावासाची भीती दाखवली जाते - उद्धव ठाकरे 
गाईला मारलं तर शिक्षा जास्त, माणसाला मारलं की शिक्षा कमी, कायदा कुणासाठी आहे? - उद्धव ठाकरे 
शेंडी, जानवंवालं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही - उद्धव ठाकरे

फुकटं वीज देणं खरंच शक्य आहे का ? - उद्धव ठाकरे

 मोदींच्या राज्यात कुणीही सुखी नाही, त्रास देण्याशिवाय मोदी सरकारने काय दिलं? - उद्धव ठाकरे

भाजपाची गोमांसाबाबत भूमिका काय - उद्धव ठाकरे

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणतात गोमांस कमी पडणार नाही -उद्धव ठाकरे

होय आम्ही सत्तेतही आणि विरोधातही - उद्धव ठाकरे

जीएसटीबाबत आम्ही भाजपाला पाठिंबा दिला - उद्धव ठाकरे
नोटबंदी कशासाठी आणि कुणासाठी - उद्धव ठाकरे 

काळा पैसा, भ्रष्टाचार अजूनही देशात तसाच आहे - उद्धव ठाकरे 
8 ऑक्टोबरला नोटबंदी झाल्यानंतर 11 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सर्वप्रथम विरोध केला - उद्धव ठाकरे

जीएसटीवेळी सेनेने भूमिका लावून धरली नसती, तर महापालिकांचं महसूल बुडालं असतं - उद्धव ठाकरे
सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं कामच आम्ही करतोय - उद्धव ठाकरे 
भाजपावाले म्हणतात, 'वंदे मातरम्' न बोलणं हा देशद्रोह नाही - उद्धव ठाकरे 
इकडे सत्ता, तिकडे सत्ता, पण कारभार बेपत्ता - उद्धव ठाकरे
या देशाची ओळख ‘हिंदुस्थान’ व्हावी म्हणून भाजपशी युती केलीय - उद्धव ठाकरे 

मोहन भागवत यांना राष्ट्रपती का केलं नाही - - उद्धव ठाकरे 

रोहिंग्याची ब्याद इथे नकोय - उद्धव ठाकरे

रोहिंग्यांबाबत फालतू प्रेम व्यक्त करू नका - उद्धव ठाकरे 
रोहिंग्या मुस्लिम आपले कुणीही लागत नाहीत - उद्धव ठाकरे
रोहिंग्या मुसलमान असले तर बांगलादेश त्यांना स्वीकारायला तयार नाही - उद्धव ठाकरे

संपूर्ण देशात 5 वस्तूंचे भाव स्थिर ठेऊन दाखवा - उद्धव ठाकरे 
समान कर आहे मग इंधनाचे दर समान का नाहीत - उद्धव ठाकरे 
उच्चस्तरीय समितीतील लोकांनी ऐन गर्दीत जिन्यावरुन वर-खाली ये-जा करा - उद्धव ठाकरे
संपूर्ण देशात कारभाराचं चिखल - उद्धव ठाकरे
शिवसेना आणि शिवतीर्थ ही बांधिलकी - उद्धव ठाकरे 
काल हॉस्पिटलमध्ये प्रेतं पाहून शब्द फुटत नव्हते - उद्धव ठाकरे 
शिवसैनिक हे वडिलोपार्जित मिळालेली शस्त्रं  - उद्धव ठाकरे 
काश्मीर ते कन्याकुमारी बुलेट ट्रेन करा -  उद्धव ठाकरे 
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कशासाठी  -  उद्धव ठाकरे

बुलेट ट्रेन हा फुकटचा नागोबा आहे - उद्धव ठाकरे
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करा - उद्धव ठाकरे 

कुणी मागितली आहे बुलेट ट्रेन?, मग हा सगळा खटाटोप कोणासाठी? - उद्धव ठाकरे
तमामा माता भगिनींच्या स्वप्नाचा चुराडा करून तुम्ही चांगली स्वप्न बघता. फुकट नागोबा कशाला हा? - उद्धव ठाकरे

माझं भाग्य आहे की मला शिवसैनिकांसारखी शस्त्रं मिळाली, शिवसैनिक हीच माझे शस्त्रं - उद्धव ठाकरे

मी सर्वसामान्य माणसांची लढाई लढत आहे- उद्धव ठाकरे

मळ दिसतोय, कमळ कुठे आहे - उद्धव ठाकरे

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेवरुन भाजपावर उद्धव ठाकरे यांची टीका 

पियुष गोयल यांना आज जाग आली आहे का ?

एलफिन्स्टन दुर्घटनेत राजकारण आणायचं नाही - उद्धव ठाकरे

समोर कोण आहे त्याची पर्वा करत नाही - उद्धव ठाकरे

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीचे 23 बळी हे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे बळी आहेत - संजय राऊत 

सरकारनं जनतेच्या पाठित खंजीर खुपसलाय  - संजय राऊत 

राज्याच्या संरक्षणासाठी प्रत्येक शिवसैनिक कमांडो - संजय राऊत 

बुलेट ट्रेन आहे की मरणाची एक्स्प्रेस? - संजय राऊत 

ब्रिटीश गेले आणि हे अहमदाबादी टोपीवाले आले - संजय राऊत 

बुलेट ट्रेनमधून लुटारू  येणार आहेत - संजय राऊत

थोड्या दिवसांत हवेवरही जीएसटी लावतील - संजय राऊत

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांना दसरा मेळाव्यात वाहण्यात आली श्रद्धांजली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांना यापुढे जे अपशब्द बोलतील त्यांना  फटकवा - गुलाबराव पाटील






 

Web Title: What will Uddhav Thackeray say in Dasara rally? Attention to All Speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.