महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ राहणार- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 03:03 PM2019-01-28T15:03:31+5:302019-01-28T15:05:42+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकसभा आणि राज्यसभेतील शिवसेनेच्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती.

We will be our elder brother in Maharashtra - Sanjay Raut | महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ राहणार- संजय राऊत

महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ राहणार- संजय राऊत

Next

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकसभा आणि राज्यसभेतील शिवसेनेच्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाच्या होऊ घातलेल्या युतीवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ राहणार आहोत. आम्ही बैठकीत राफेलमधील घोटाळा आणि दुष्काळावर चर्चा केली.

खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षणांची तरतूद केली आहे. त्यानुसार ज्यांचं उत्पन्न वार्षिक 8 लाख रुपये आहे, त्यांना कर भरण्यापासून मुक्त केले जावे. त्यांना आता सरकारनं गरीब ठरवल्यानं करातून सूट देण्यात यावी, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.  महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार. दिल्लीचे तख्त देखील हा मोठा भाऊ गदागदा हलवणार. मात्र भाजपाकडून युतीचा प्रस्ताव नाही. सगळ्या अफवा आहेत, असे सूचक विधान करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत सावध भूमिका घेतली आहे. आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. यानंतर राऊत बोलत होते.

 युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आजच्या बैठकीत जुजबी चर्चा झाली. मात्र ही बैठक युतीचा प्रस्ताव घेऊन बसलेली नव्हती. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ही बैठक होती. देशभरात आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्वांचाच प्राप्तिकर माफ व्हावा. सर्व गरिबांसाठी हाच एक मोठा दिलासा असेल, असा ठराव या बैठकीत शिवसेना खासदारांनी मंजूर केला. उद्धव व ठाकरे यांनी केंद्रात मोदी सरकारला अशी मागणी केली असून, 1 फेब्रुवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा, यासाठी शिवसेना खासदार आग्रही राहणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. 





 

Web Title: We will be our elder brother in Maharashtra - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.