मुंबईत जलवाहिनीतून पाणी थेंब थेंब गळं... पालिकेकडे तब्बल ५५ हजार तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 09:32 AM2023-12-21T09:32:12+5:302023-12-21T09:33:50+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाणी गळतीचे प्रकार अधूनमधून घडत आहेत.

Water is leaking from the water channel in Mumbai as many as 55 thousand complaints to the municipality | मुंबईत जलवाहिनीतून पाणी थेंब थेंब गळं... पालिकेकडे तब्बल ५५ हजार तक्रारी

मुंबईत जलवाहिनीतून पाणी थेंब थेंब गळं... पालिकेकडे तब्बल ५५ हजार तक्रारी

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाणी गळतीचे प्रकार अधूनमधून घडत आहेत. गेल्या दोन वर्षांत लागलेल्या गळतीमुळे थेंब थेंब पाणी वाया गेले. एखाद्या लहान शहराला पुरेल इतके पाणी वाया गेले असून, याकडे लक्ष वेधण्यासाठी तब्बल ५५ हजार तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. यात सर्वाधिक पूर्व उपनगरातून २० हजार २७६ इतक्या तक्रारी आल्या आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात आहेत. जवळपास  ५० ते १०० किमी अंतरावरून जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी मुंबईत आणले जाते. बहुतेक जलवाहिन्या या ब्रिटिशकालीन असून, अनेक जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रकार घडत असतात.

 गळती रोखण्यासाठी ...

पाणी चोरी आणि गळती रोखण्यासाठी काही ठिकाणी बोगद्यातून पाणीपुरवठा करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. बोगदे मजबूत असल्याने त्यांना लवकर तडा जाणार नाही, शिवाय पाणी चोरी करणेही शक्य होणार नाही. बोगद्याचे  काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

२५ टक्के पाणी वाया :

पाणीचोरी आणि गळतीमुळे रोज सुमारे २५ टक्के पाणी वाया जाते. मुंबईला रोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. पाणीपुरवठा करणाऱ्या सहा धरणांची  पाणी साठविण्याची क्षमता १४ लक्ष ४७ हजार ३६३ दशलक्ष एवढी आहे. तलाव-धरण क्षेत्राच्या परिसरात सुमारे ३८० किमी अंतरात जलवाहिन्यांचे जाळे आहे. धरणातील पाण्याला शुद्धिकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी २४०० मिमी व्यासाची जलवाहिनी आणि ५५०० मिमी व्यासाचा  भूमिगत बोगदा आहे.

Web Title: Water is leaking from the water channel in Mumbai as many as 55 thousand complaints to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.