आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट

By मनोहर कुंभेजकर | Published: February 26, 2023 05:39 PM2023-02-26T17:39:19+5:302023-02-26T17:39:35+5:30

आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण येथील आदिवासी पाड्यांना भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी बोरिवली विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार सुनील राणे यांनी विधानसभेच्या आपल्या भाषणात केली होती.

Visit of Tribal Ministers to Tribal Padas of Gorai and Manori | आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट

आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट

googlenewsNext

मुंबई - बोरिवली पश्चिम गोराई आणि मालाड पश्चिम मनोरी येथे आदिवासी पाडे येतात.येथील आदिवासी पाड्यांचे नागरिक शासकीय योजनांपासून आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तसेच आदिवासी बांधव आणि महिलांना स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण येथील आदिवासी पाड्यांना भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी बोरिवली विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार सुनील राणे यांनी विधानसभेच्या आपल्या भाषणात केली होती.

त्यामुळे आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आमदार सुनील राणे यांच्या समवेत गोराई येथील बाबर पाडा आणि जमझाड पाडा,मोठी डोंगरी आणि मनोरी येथील मंटण पाडा या आदिवासी पाड्यांना  भेटी दिल्या. यावेळी मंत्रीमहोदयांनी येथील आदिवासी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे राज्याच्या आदिवासी मंत्र्यांनी सुमारे ४०वर्षांनी येथील आदिवासी पाड्यांना भेटी देण्याची ही पहिलाच घटना असल्याचे आमदार सुनील राणे यांनी लोकमतला सांगितले.

यावेळी आपल्या भाषणात मंत्री डॉ. विजयकुमार गावीत म्हणाले की,आदिवासी बांधवांना शासकीय सुविधा मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सुरण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.येथील आदिवासी बांधवांशी चर्चा केल्यावर त्यांच्या अनेक समस्या आमदार सुनील राणे यांनी सोडवल्या आहेत.

येथील आदिवासी बांधवांना घरघंटी प्रदान करणे,त्यांना शिलाई मशीन देणे,त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे,त्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे आदी सुविधा शासन उपलब्ध करून देणार आहेत.तसेच आदिवासी बांधव व महिलांना व्यवसाय करायचा आहे त्यांना शासन मदत करणार असल्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

आमदार सुनील राणे यांनी आपल्या भाषणात येथील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्याची मंत्री महोदयांकडे मागणी केली.विशेष म्हणजे गोराई आणि मनोरी भागात आरोग्याची मोठी समस्या असून येथे सुसज्ज हॉस्पिटल नाही।त्यामुळे येथील नागरिकांना हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आणि विशेष म्हणजे मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी सदर मागणी मान्य केली.यामुळे

एकंदरीत आदिवासी मंत्री आमच्या दारी आणल्याबद्धल आणि समस्या जाणून घेतल्या बद्धल आणि येथे हॉस्पिटल उपलब्ध करून देणार असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्या बद्धल आदिवासी बांधबांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. त्यांनी आमदार सुनील राणे यांचे आभार मानले

यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण,
आदिवासी विकास विभाग ठाणेचे अतिरिक्त सहआयुक्त 
प्रदीप देसाई,माजी नगरसेवक शिवा शेट्टी, बोरिवली भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा निवळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
 

 

Web Title: Visit of Tribal Ministers to Tribal Padas of Gorai and Manori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.