मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे ज्येष्ठ नागरिकांचे बचावले प्राण! मुलुंड स्थानकातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 04:07 PM2017-12-27T16:07:18+5:302017-12-27T17:05:23+5:30

मोटारमनने प्रसंगावधान दाखवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचे प्राण बचावले आहे. बुधवारी दुपारी ही घटना मुलुंड स्थानकात घडली. डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालेली धीमी लोकल दुपारी २.३६ मिनिटांनी मुलुंड स्थानकात पोहचली.  

Veteran survival lives due to the advent of the motorman! Types of Mulund Station | मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे ज्येष्ठ नागरिकांचे बचावले प्राण! मुलुंड स्थानकातील प्रकार

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे ज्येष्ठ नागरिकांचे बचावले प्राण! मुलुंड स्थानकातील प्रकार

googlenewsNext

- महेश चेमटे

मुंबई : मोटारमनने प्रसंगावधान दाखवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचे प्राण बचावले आहे. बुधवारी दुपारी ही घटना मुलुंड स्थानकात घडली. डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालेली धीमी लोकल दुपारी २.३६ मिनिटांनी मुलुंड स्थानकात पोहचली.  
यावेळी ६० ते वर्षाचा प्रवासी रेल्वे रुळावर आलेला पाहताच मोटारमनने प्रसंगावधान राखत लोकल थांबवली.

 हा प्रवासी दिंडोशी येथे राहणारा असून तो एम.एस. चव्हाण असे नाव सांगत आहे. मोटारमनने प्रसंगावधान राखत त्या प्रवाशांचे प्राण वाचवले. या प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सदर प्रवाशाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्या प्रवाशाला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या मेन मार्गावरील सेवेवर कोणताच परिणाम झाला नाही. मोटारमनचे प्रसंगावधान आणि रेल्वे पोलिसांची तत्परता यामुळे ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचले.

Web Title: Veteran survival lives due to the advent of the motorman! Types of Mulund Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.