ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं मुंबईत निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 05:37 PM2018-01-04T17:37:52+5:302018-01-04T17:41:33+5:30

अनेक रसिकांना आपल्या संतूर वादनाने मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Veteran saint Pandit Ulhas Bapat died in Mumbai | ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं मुंबईत निधन

ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं मुंबईत निधन

googlenewsNext
ठळक मुद्देप्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज निधनमुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास संतूर वादनाने अनेक रसिकांना केले मंत्रमुग्ध

मुंबई : अनेक रसिकांना आपल्या संतूर वादनाने मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे आज निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांची आज पुण्यतिथी असतानाच पंडित उल्हास बापट यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांनी आर. डी. बर्मन यांच्या गाजलेल्या अनेक गाण्यांसाठी संतूरवादन केले आहे. तसेच, आर. डी. बर्मन यांच्यासह हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी उल्हास बापट यांना मानाचे स्थान दिले.
याचबरोबर, 1987 मध्ये घर या चित्रपटाच्या संगीतासाठी संतूरवादन करून पंडित उल्हास बापट यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर आर. डी. बर्मन आणि पंडित उल्हास बापट यांची घट्ट मैत्रीच जमली. आर. डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात संतूरचे सूर मिसळून रसिकांना मंत्रमुग्ध केले. 1942 ए लव्ह स्टोरी आणि जैत रे जैत या चित्रपटांतील संगीतातही पंडित उल्हास बापट यांनी संतूरवादन केले आहे. याशिवाय, त्यांचे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये संगीताचे कार्यक्रम झाले. त्यांच्या संतूरवादनाची कीर्ती दूरवर पसरली.  पंडित नारायण मणी यांच्याबरोबर पंडित उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स नावाचे दोन अल्बम प्रकाशित झाले आहेत.

 

Web Title: Veteran saint Pandit Ulhas Bapat died in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.