Veteran journalist, thinker and author Muzaffar Hussain passed away | ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक मुझफ्फर हुसेन यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक मुझफ्फर हुसेन यांचे निधन

मुंबई- ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन यांचे आज सायंकाळी ७.२० वा. निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. २० मार्च १९४० रोजी जन्मलेले मुझफ्फर हुसेन महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रातील प्रसिद्ध आणि प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सर्वांना सुपरिचित होते. त्यांना महाराष्ट्र शासनासह, केंद्र शासनाचेही अनेक पुरस्कार मिळाले होते.
२००२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा २०१४ लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकाकिता पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कार त्यांना मिळाले होते.
बुधवारी सकाळी त्यांच्यावर विक्रोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुझफ्फर हुसेन यांनी लिहिलेली अनेक पुस्तके गाजली. त्यापैकी इस्लाम व शाकाहार, मुस्लिममानसशास्त्र, दंगों में झुलसी मुंबई, अल्पसंख्याक वाद : एक धोका, इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन, लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान, समान नागरी कायदा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.


Web Title: Veteran journalist, thinker and author Muzaffar Hussain passed away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.