ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 06:27 PM2018-03-06T18:27:25+5:302018-03-07T05:06:42+5:30

वसंत फेणे यांच्या निधनाने साहित्यविश्वात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे

Vasant Narhar Phane passed away | ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचं निधन

Next

मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचं निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते. खार येथील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुंबईतील जोगेश्वरीत जन्म झालेल्या वसंत फेणे यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. मुंबई, कारवार आणि सातारा असा प्रवास करत वसंत फेणेंनी अनेक अडथळ्यांवर मात करत साहित्यविश्वात स्थान निर्माण केलं होतं. 

वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर वसंत फेणे यांना त्यांच्या आईने भावंडांसह कारवारला नेले. तिथे चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या भावासोबत साता-याला आले. पण तिथून परत कारवार आणि मग तिथून मुंबई असा प्रवास त्यांनी केला. शिक्षणासाठी वसंत फेणेंना हा सर्व प्रवास करावा लागला. वसंत फेणेंनी मुंबईत आल्यानंतर राष्ट्र सेवा दलाशी स्वत:ला जोडून घेतले.

कथा आणि कादंबरी हे वसंत फेणेंच्या लेखनातील आवडते प्रकार होते. त्यांच्या ‘काना आणि मात्रा’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘विश्वंभर बोलविले’ या कादंबरीसाठी ना. सी. फडके पुरस्कारानेही गौरव झाला. गेल्या वर्षी ‘शब्द – द बुक गॅलरी’च्या वतीने वसंत फेणे यांच्या एकूण साहित्यिक कारकीर्दीसाठी ‘भाऊ पाथ्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार’ देण्यात आला.

वसंत फेणे यांची साहित्यसंपदा...
काना आणि मात्रा (कथासंग्रह),
कारवारची माती (कादंबरी),
काही प्यादी काही फर्जी
(कथासंग्रह), ज्याचा त्याचा क्रूस
(कथासंग्रह), देशांतर कथा
(कथासंग्रह), ध्वजा (कथा, लेख,
भाषणे), निर्वासित नाती
(कथासंग्रह), पंचकथाई
(कथासंग्रह), पहिला अध्याय
(कथासंग्रह), पाणसावल्यांची
वसाहत (कथासंग्रह), पिता-पुत्र
(कथा), मावळतीचे मृदगंध
(कथासंग्रह), मुळे आणि पाळे
(कथासंग्रह), विश्वंभरे बोलविले
(कादंबरी), शतकान्तिका
(कथासंग्रह), सहस्रचंद्रदर्शन
(कादंबरी), सेंट्रल बस स्टेशन
(कादंबरी), हे झाड जगावेगळे
(कथासंग्रह)

वसंत फेणे यांच्या ‘काना आणि
मात्रा’ या कथासंग्रहाला
राज्य
सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा
पुरस्कार मिळाला आहे.
‘विश्वंभर बोलविले’ या
कादंबरीसाठी त्यांचा ना.सी.
फडके पुरस्कारानेही गौरव
झाला. ‘शब्द-द बुक गॅलरी’च्या
वतीने फेणे यांच्या एकूण
साहित्यिक कारकिर्दीसाठी
‘भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द

Web Title: Vasant Narhar Phane passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.