छटपुजेला विरोध करतोय, हा वर्षा गायकवाड यांचा आरोप अत्यंत खोडसाळ; आमदार अतुल भातखळकर यांची टीका

By मनोहर कुंभेजकर | Published: November 16, 2023 03:46 PM2023-11-16T15:46:58+5:302023-11-16T15:47:16+5:30

माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे हनुमान नगरमध्ये दोन ठिकाणी, पोयसरमध्ये तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टी छटपूजा साजरी करते.

Varsha Gaikwad's allegation of opposing Chhat Puja is very mischievous; Criticism of MLA Atul Bhatkhalkar | छटपुजेला विरोध करतोय, हा वर्षा गायकवाड यांचा आरोप अत्यंत खोडसाळ; आमदार अतुल भातखळकर यांची टीका

छटपुजेला विरोध करतोय, हा वर्षा गायकवाड यांचा आरोप अत्यंत खोडसाळ; आमदार अतुल भातखळकर यांची टीका

मुंबई : कांदिवलीमधील भारतीय जनता पार्टी आणि मी स्वतः छटपुजेला विरोध करतोय, हा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आरोप अत्यंत खोडसाळ स्वरूपाचा असल्याची टिका भाजप नेते व कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

आमदार भातखळकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि आपण स्वतः कांदिवली पूर्व विधानसभेत छटपुजा अत्यंत उत्साहात साजरी करतो. येथे काँग्रेसच्या माजी नगरसेविका छटपुजा करत होत्या मात्र नागरिकांनी त्यातील आर्थिक गफलतीविषयी तक्रारी केल्या,त्यामुळे मुंबई महापालिकेने त्यांना परवानगी नाकारली ही वस्तुस्थिती आहे. 

माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे हनुमान नगरमध्ये दोन ठिकाणी, पोयसरमध्ये तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टी छटपूजा साजरी करते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच उत्साहात आणि जोशात लोखंडवाला येथील महाराणाप्रताप उद्यानात भाजपच्या वतीने जोरदार छटपुजा साजरी करण्यात येणार आली आहे. नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी अशा स्वरुपाचे खोडसाळ आरोप करू नयेत, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

Web Title: Varsha Gaikwad's allegation of opposing Chhat Puja is very mischievous; Criticism of MLA Atul Bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.