Shivsena Dasara Melava 2018: देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी व मंगळ कोण ?- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 08:15 PM2018-10-18T20:15:02+5:302018-10-18T20:19:39+5:30

देशाच्या पत्रिकेत शनी आणि मंगळ वक्री झाले आहेत. ते शनी, मंगळ कोण आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray criticize on narendra modi and udhav thackeray | Shivsena Dasara Melava 2018: देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी व मंगळ कोण ?- उद्धव ठाकरे

Shivsena Dasara Melava 2018: देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी व मंगळ कोण ?- उद्धव ठाकरे

Next

मुंबई- देशाच्या पत्रिकेत शनी आणि मंगळ वक्री झाले आहेत. ते शनी, मंगळ कोण आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवर निशाणा साधला आहे. दादरमधल्या शिवाजी पार्कवरच्या दस-या मेळाव्यात ते बोलत होते. सरकार कोणाचंही येऊ द्या, दरवर्षी रावण उभाच आहे. पण राम मंदिर काही उभं राहत नाही. छातीत नव्हे, तर मनगटात बळ असावे लागते. परंतु मनगटामध्ये जोर किती आहे ते पाहावं लागतंय. अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. पण ते संपले असून, शिवसेना आजही उभी आहे. घरी जातानाही पेट्रोलचे दर वाढत आहेत.

देशातला हिंदू जागा झालाय, हे विसरू नका. सत्तेमध्ये असून तुम्ही बाहेर का नाही पडत. मला आणखी कोणी राजकारण शिकवू नये. सरकारच्या विरोधात बोलल्यास देशद्रोहाचा ठपका ठेवला जातोय.  सोसायटीच्या निवडणुकीतही मुख्यमंत्री लक्ष घालतात. देशातला हिंदू जागा आहे. गॅस, पेट्रोल लोकांना रावण वाटू लागले आहेत. देशाचा कारभार कसा चाललाय? आता संघही सरकारविरुद्ध बोलायला लागलाय. 2014 सालची हवा राहिलेली नाही. हवा बदलली आहे, असंही उद्धव ठाकरे मोदी यांना उद्देशून म्हणाले आहेत.

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. तरी अजूनही दुष्काळ जाहीर झालेला नाही. किती दिवस ही चर्चा करत राहणार आहोत. कर्नाटकने दुष्काळ जाहीर केलाय. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर न झाल्यास शिवसेना स्वतःच्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. सेना-भाजपाची युती 25 वर्षांपासूनची होती. 

Web Title: Uddhav Thackeray criticize on narendra modi and udhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.