गोरेगावात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 11:24 AM2018-12-23T11:24:04+5:302018-12-23T12:44:39+5:30

गोरेगावातल्या पश्चिम भागातल्या मोतीलाल नगरमध्ये एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे.

Two people were killed and eight others injured two floor building collapses in Goregaon | गोरेगावात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

गोरेगावात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

मुंबई-  गोरेगावातल्या पश्चिम भागातल्या मोतीलाल नगरमध्ये एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. ही इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. गोरेगावात ही दुमजली इमारत कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे. 





गोरेगावातल्या म्हाडा वसाहतीत सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. 22 वर्षीय श्रवण कुमारचा मृत्यू झाला आहे, तर इतर सात जण जखमी आहेत. मंगल बनसा(35 वर्षं), मुन्ना शेख(30 वर्षं), शिनू (35 वर्षं), हरी वडार (3 वर्षं), शंकर पटेल(21 वर्षं), सरोजा वडार(24 वर्षं), रमेश निशाद (32 वर्षं) जखमींची नावे आहेत. 

Web Title: Two people were killed and eight others injured two floor building collapses in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.