अंधेरीत ४० लाखांचे एमडी हस्तगत, दोन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 12:34 PM2019-01-14T12:34:40+5:302019-01-14T14:32:56+5:30

अंबोली पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचे एमडी हस्तगत करत दोघांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असुन दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

two people arrested with cocaine worth Rs. 40 Lakhs Mephedrone in Mumbai | अंधेरीत ४० लाखांचे एमडी हस्तगत, दोन जणांना अटक

अंधेरीत ४० लाखांचे एमडी हस्तगत, दोन जणांना अटक

Next
ठळक मुद्देअंबोली पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचे एमडी हस्तगत करत दोघांच्या मुसक्या आवळल्या. दोघांना अटक करण्यात आली असुन दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. इम्रान अब्दुल खालिद अन्सारी (३२) आणि अफझल हुसेन मुमताजली अन्सारी (३८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मुंबई - अंमली पदार्थ विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्याचा निश्चय केलेल्या मुंबई पोलिसांना रविवारी अजून एक यश मिळाले. अंबोली पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचे एमडी हस्तगत करत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असुन दया नायक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

इम्रान अब्दुल खालिद अन्सारी (३२) आणि अफझल हुसेन मुमताजली अन्सारी (३८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अंधेरीत म्हाडा परिसरात या दोघांकडून १ किलो मेफेड्रीन हस्तगत करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ४० लाख रुपये आहे. त्यांच्या एक मोटर सायकलही हस्तगत करण्यात आली आहे. यातील इम्रान हा पश्चिम उपनगरातील एक मोठा अंमली पदार्थ विक्रेता असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहीया आणि अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायक आणि पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी ही कारवाई केली असून अधिक चौकशी सुरू आहे.

Web Title: two people arrested with cocaine worth Rs. 40 Lakhs Mephedrone in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.