बेकायदा मांसाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:05 PM2023-02-16T13:05:01+5:302023-02-16T13:08:16+5:30

त्या वाहनात ताडपत्री खाली झाकलेले कोणत्यातरी जनावराचे तुकडे सापडले .  त्याचे वजन सुमारे साडे सोळाशे किलो भरले. 

Two arrested for smuggling illegal meat in mira road mumbai | बेकायदा मांसाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक 

बेकायदा मांसाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक 

googlenewsNext

मीरारोड - बेकायदा अज्ञात जनावराच्या मांसाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाहनासह अटक केली आहे . तर सदर मांस त्यांनी कुठून आणले व कोणाला विक्री केले जाणार होते आदींचा तपास पोलीस करत आहेत. उपनिरीक्षक जगन्नाथ पडेलकर , हवालदार हौसराव आंधळे हे वरसावे पुलाच्या ठिकाणी बंदोबस्त साठी तैनात असताना पहाटेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान एक पिकअप वाहन तपासणीसाठी बाजूला घेतले . त्या वाहनात ताडपत्री खाली झाकलेले कोणत्यातरी जनावराचे तुकडे सापडले .  त्याचे वजन सुमारे साडे सोळाशे किलो भरले. 

काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालक वाजिद अली शेख (४२) रा . फातमा नगर , भिवंडी व साथीदार क्लिनर अहमदराजा सिद्दीकी (२३) रा . महाराजगंज ,उत्तरप्रदेश ह्या दोघांना ताब्यात घेतले . पोलिसांनी ५ लाख किमतीचे वाहन व २ लाख १५ हजारांचे मांस जप्त केले आहे . मीरारोडच्या नया नगर मधील लियाकत याने सदर मांस मागवले असल्याचे चालकाने सांगितल्यावर त्याचा शोध पोलीस घेत आहेत . 

 

Web Title: Two arrested for smuggling illegal meat in mira road mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.