ट्रोलिंग करणे चुकीचेच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 02:12 AM2019-06-25T02:12:12+5:302019-06-25T02:12:18+5:30

‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत, आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच, ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते.

Trolling is wrong | ट्रोलिंग करणे चुकीचेच

ट्रोलिंग करणे चुकीचेच

‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत, आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच, ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या घडामोडी, त्याचे सेल्फीज आणि एन्जॉयमेंटचे स्टेटस तरुणाईच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिसू लागले आहेत. त्यावर ट्रोलिंग सुरू झाले की, मात्र मूड खराब होऊन नैराश्यापर्यंत जाण्याची उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक करिअर, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी सवय, नोकरीच्या ठिकाणच्या समस्या, कौटुंबिक समस्या यांसह वैयक्तिक समस्यांमुळे तरुणाई नेहमीच मानसिक तणावात असल्याचे दिसून येते. परिणामी, सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होणार नाही, याची खबरदारी बाळगली पाहिजे.

एखाद्याचे मत पटले नाही, म्हणून त्याला ट्रोल करणे हे अतिशय चुकीचे आहे. एखाद्या विषयावर चर्चा होत असताना, त्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. माझेच मत योग्य, दुसऱ्याचे चूक हा अ‍ॅटिट्यूड चुकीचा आहे. दुसºयाच्या मताचाही आदर व्हायलाच हवा. पूर्वीदेखील वादविवाद, टीका होत असे, पण त्यात दोन्ही बाजूंच्या मतांचा योग्य तो आदर राखला जायचा. अलीकडे मात्र, याचा विचार होताना दिसत नाही. आजकाल सोशल मीडियामुळे कोणत्याही गोष्टीला चटकन प्रसिद्धी मिळते, त्याचे पडसादही उमटतात. म्हणूनही अनेकदा या माध्यमांद्वारे आपली मते समाजावर बिंबविण्याचे प्रयत्न होताना दिसतात.
- प्रज्ञा मणेरीकर, ठाणे.

बºयाचदा सोशल मीडियावर किती लाइक्स मिळाले, याविषयी विचार करत राहतो. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आपण त्याच विचारांत अडकून राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जगण्यावर होत असतो. त्यामुळे आता या ट्रोलिंगला वेळीच आवर घालता आला पाहिजे. यासाठी नकारात्मक प्रतिक्रियांचा परिणाम होऊ न देण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे.
- उदय होनमुखे, गोखले महाविद्यालय, बोरीवली.

सोशल मीडियामुळे एखाद्या गोष्टीला सपोर्ट मिळतो, ही चांगली बाब आहे. ट्रोलच्या दिशेने जाते, तेव्हा कधी-कधी या माध्यमातून खोट्या गोष्टी पसरविल्या जातात. त्यावर आपण प्रतिक्रिया देतो, त्यामुळे संबंधित व्यक्तीला समस्या निर्माण होऊ शकतात. त्या व्यक्तीला ताण येऊ शकतो. लोक सतत त्याविषयी बोलतात. त्यात समस्या सोडविण्याऐवजी गॉसिप होते. लोक सतत चांगले बोलतात असे नसते. या गोष्टींना मर्यादा हव्यात. सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. त्यावर आपले मत व्यक्त करण्याची गरज आहे का, ते पाहिले पाहिजे.
- ऋतुजा जोशी, मानसशास्त्रज्ञ.

लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. सोशल मीडिया त्यांचे प्रभावी माध्यम झाले आहे. त्यामुळे अशा माध्यमांत मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. एखाद्याला एखाद्याचे मत पटले नाही, तर ते स्वाभाविक असेल. मात्र, आपले मत पटत नाही, म्हणून एखाद्याला लक्ष्य करणे किंवा सोशल मीडियावर ट्रोल करणे हा प्रकार चुकीचा आहे. प्रत्येकाच्या मतांचा आदर केला पाहिजे.
- प्रियल राऊत,
नोकरदार, डोंबिवली.
समाजमाध्यम हे विचारांचे आदानप्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण साधन झाले आहे. त्यामुळे अनेक विषयांवर समाजमाध्यमांत वेगवेगळे विचार व्यक्त करीत असतात. ती त्यांची वैयक्तिक मते असतात. आपल्याला ती पटली तर उत्तमच, पण एखाद्याचा विचार पटत नाही, म्हणून त्यांना ट्रोल करणे हा एक अनुचित प्रकार सध्या बळावत असल्याचे चित्र दिसत आहे.
- स्वप्निल पवार, मरिन इंजिनीअर, कल्याण.

सोशल मीडियावरील चर्चा, चर्चा म्हणण्यापेक्षा वादविवाद पाहता, सध्याच्या काळात आपण आपली सहनशक्ती गमावून बसतो आहोत की काय, अशी भीती वाटते. चघळायला दररोज काही ना काही नवीन विषय आणि मग त्यावर टोकाची मतं, असाच काहीसा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर दिसतो. आपलं मत दुसºयाला पटत नाही म्हणजे काय? अशाच हाराकिरीने सगळे त्यावर तुटून पडतात आणि त्यातही कोणी विरोध केला, तर मग काय बघायलाच नको, पण हे चुकीचे आहे. दुसºयाचे मत ऐकून घेण्याची आपली तयारी असायलाच हवी. ते न ऐकता, केवळ आपल्याला विरोध केला, म्हणून ट्रोल करण्यात काहीच अर्थ नाही.
- स्नेहा आठल्ये, ठाणे.

सोशल मीडीयावर कळत-नकळत प्रतिक्रिया उमटत असतात. अशा परिस्थितीत सकारात्मक प्रतिक्रियांपेक्षा नकारात्मक प्रतिक्रियांचा खोलवर परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांना सामोरे कसे जायचे याविषयी बºयाचदा तरुणपिढी अनभिज्ञ असते. अशा परिस्थितीत अता महाविद्यालयातच अशा पद्धतीच्या कार्यशाळा किंवा समुपदेशन वर्ग घेतले पाहिजे. जेणेकरुन, याविषयाबद्दल तरुणाई व्यक्त होण्यास मदत होईल.
- सौरभ देशमुख, केएमसी कॉलेज आॅफ आर्ट्स,
सायन्स अँड कॉमर्स

सध्या कोणत्याही प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्रीने सोशल मीडियावर एखादी वेगळी पोस्ट केली की, त्यांना ट्रोल करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. सोशल मीडिया हे एक असे साधन आहे, जिथे कोणीही मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे अभिनेता-अभिनेत्री हेदेखील त्यांना मनाला जे पटेल, त्याप्रमाणे व्यक्तच होत असतात. ते समोरच्या व्यक्तीला नाही पटले, तर त्यांना ट्रोल करणे हे चुकीचे आहे, पण काही वेळेस प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठीसुद्धा स्वत:हून ट्रोल करून घेतले जाते. त्यावेळी ती नकारात्मक-सकारात्मक अशी कोणत्याही प्रकारची वक्तव्य करून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ट्रोलिंग ही काळाची गरज झालीय, असे म्हटले तरी हरकत नाही .
- आकांक्षा तळेकर, साठ्ये महाविद्यालय.

आजच्या जगात सोशल मीडिया हे माध्यम काळाची गरज ठरलेली असून, सगळेच युवा सोशल मीडियावर स्वत:ची प्रोफाइल तयार करत असतात. यातून युझर्स आपली ओळख लोकांपर्यंत पोहोचवत असतो. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही युझर्स एखाद्या मॉडेल, अभिनेता-अभिनेत्री, राजकारणी, ब्लॉगर्स इत्यादी व्यक्तींना ट्रोल करतात. माझ्यामते ट्रोलिंग हा अत्यंत वाईट गुन्हा आहे. सोशल मीडिया हे माध्यम युझर्सला स्वतंत्रपणे मत मांडण्यासाठी मुभा देते, परंतु याच गोष्टीचा फायदा घेऊन युझर्स ट्रोलिंग करतात. आजकाल कोणीही ट्रोल होऊ शकतात, पण ट्रोल करताना त्या व्यक्तीचे कुटुंब आणि मित्रपरिवार लोक वाचत असतात. ट्रोलिंग करताना ट्रोलर्स सर्रास काहीही अश्लील बोलून जातात, पण त्या गोष्टीचा नकारात्मक प्रभाव इतर वाचकांवर पडत असतो, तसेच एखाद्याच्या मानसिक स्थितीवर त्याचा परिणाम होत असतो.
- वेदिका शिंदे, एम. डी. महाविद्यालय.

Web Title: Trolling is wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई