तिहेरी तलाक विधेयक हा मुस्लिमांना तुरुंगात डांबण्याचा डाव - आझमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:21 AM2019-01-04T01:21:46+5:302019-01-04T01:22:50+5:30

केंद्र शासनाकडून मुस्लीम महिलांच्या नावाखाली लादले जाणारे तिहेरी तलाक विधेयक म्हणजे मुस्लीम पुरुषांना तुरुंगात डांबण्याचा डाव असल्याची टीका समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी केली आहे.

triple talaq bill is a prison for Muslims - Azmi | तिहेरी तलाक विधेयक हा मुस्लिमांना तुरुंगात डांबण्याचा डाव - आझमी

तिहेरी तलाक विधेयक हा मुस्लिमांना तुरुंगात डांबण्याचा डाव - आझमी

Next

मुंबई : केंद्र शासनाकडून मुस्लीम महिलांच्या नावाखाली लादले जाणारे तिहेरी तलाक विधेयक म्हणजे मुस्लीम पुरुषांना तुरुंगात डांबण्याचा डाव असल्याची टीका समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुस्लिमांवर अत्याचार झालेल्या दंगलीचे निकाल लागत नसल्याचा रोष व्यक्त करत आझमी यांनी ५ जानेवारीला आझाद मैदानात धरणे आंदोलनाचीही हाक दिली आहे.
या वेळी आझमी म्हणाले की, पंजाबमधील शीख दंगलीचा निकाल लागतो, मात्र मुंबईसह गुजरात व मुझफ्फरनगरमधील दंगलीचा निकाल लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली हे खटले जलदगतीने चालविण्याची गरज आहे. कारण भाजपा सत्तेत आल्यावर मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीतील आरोपींवरील खटले मागे घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून श्रीकृष्ण अहवालामधील दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: triple talaq bill is a prison for Muslims - Azmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.