निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ आदेशाने झवेरी बाजार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:51 PM2019-04-05T20:51:55+5:302019-04-05T20:55:28+5:30

सराफांचा व्यवसाय घटला; संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याची मागणी

traders in zaveri bazar upset after the area is included in economic sensitive zone | निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ आदेशाने झवेरी बाजार नाराज

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ आदेशाने झवेरी बाजार नाराज

googlenewsNext

- चेतन ननावरे

मुंबई : लोकसभा निवडणूक काळात झवेरी बाजाराचा समावेश आर्थिकदृष्ट्या संवेदनशील विभागात करण्यात आला आहे. आयोगाच्या या घोषणेनंतर ग्राहक घटल्याचा आरोप करत सराफा बाजाराने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झवेरी बाजारात चालणाऱ्या रोख व्यवहारांमुळे आयकर विभागाच्या शिफारसीमुळे हा निर्णय घेतला असून तो बदलता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितले.

दरम्यान, गुढीपाडवा आणि लग्नसराईमुळे राज्यभरात सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव कुमार जैन यांनी केला आहे. ते म्हणाले की, आशियातील सराफा बाजारात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या झवेरी बाजारात मुंबई आणि देशातून नव्हे, तर जगभरातून लोक खरेदीसाठी येतात. मात्र निवडणूक आयोगाने या क्षेत्राचा समावेश संवेदनशील विभागात केल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोने खरेदीमध्ये शासनाने २ लाख रुपयांपर्यंत खरेदी करताना पॅन कार्डची गरज नसल्याचे सांगितले आहे. याउलट एखाद्या व्यक्तीकडे ५० हजार रुपयांहून अधिक रक्कम सापडल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार आयोगाने नेमलेल्या भरारी पथकांकडे आहे. त्यामुळे चौकशीच्या फेºयात पडण्यापेक्षा इतर विभागांत जाऊन खरेदी करण्यास ग्राहक पसंती देत आहेत. तर काही ग्राहकांनी निवडणुकीनंतर खरेदी करणार असल्यांचे सांगितले. परिणामी, सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात झवेरी बाजारामधील बहुतेक दुकाने सुनसुनी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यावर मुंबई शहराचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हा निर्णय आयकर विभागाच्या शिफारसीवरून घेतल्याचे स्पष्ट केले. झवेरी बाजारातून जप्त केलेल्या ६ कोटी रुपयांमुळे आर्थिकदृष्ट्या हा विभाग संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवहार करणाºया ग्राहक किंवा सराफांनी घाबरण्याचे कारण नाही. मुळात चुकीचे काम करणाºयांना चाप लावण्यासाठीच ही घोषणा करण्यात आली आहे. त्याप्रमाणे भरारी पथक कारवाई करणार आहे. यामध्ये कोणत्याही निष्पाप ग्राहकास किंवा सराफास त्रास होणार नसल्याची ग्वाहीही जिल्हाधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: traders in zaveri bazar upset after the area is included in economic sensitive zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.