मुंबईतील तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:25 AM2018-07-14T06:25:25+5:302018-07-14T06:25:53+5:30

विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेकडून माटुंगा रोड - मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

Tomorrow's block on all three routes in Mumbai | मुंबईतील तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

मुंबईतील तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

Next

मुंबई - विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेकडून माटुंगा रोड - मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. रेल्वे रुळांची डागडुजी, ओव्हरहेड वायरसह सिग्नल यंत्रणेची तपासणी आदी कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वेवरील विद्याविहार-भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. यामुळे घाटकोपर येथून सुटणाऱ्या धिम्या लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाºया जलद लोकलला नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त अन्य स्थानकांवर थांबा देण्यात येईल. ब्लॉक काळात मध्य रेल्वेच्या लोकल सुमारे १५ मिनिटे उशिराने धावतील.
कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान ११.१० ते ४.१० वाजेपर्यंत हार्बर मार्गावर ब्लॉक काळातील कामे करण्यात येतील. यामुळे सीएसएमटी-पनवेल/बेलापूर/वाशी मार्गावरील अप-डाऊन मार्गावर एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक काळात मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेºया चालवण्यात येतील. प्रवाशांना त्याच तिकिटावर ट्रान्स हार्बर आणि मध्य मार्गाने प्रवास करण्याची मुभा मध्य रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेवर माटुंगा रोड-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक असेल. ब्लॉक काळात या गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल फेºया रद्द करण्यात येतील.

घाटकोपर पुलाच्या कामांसाठी रात्रकालीन ब्लॉक
मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकावर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी मध्यरात्री १२.४५ ते सोमवारी सकाळी ६.४५ यावेळेत घेण्यात येईल. या काळात पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यात येईल. ब्लॉकमुळे ट्रेन क्रमांक ११०६२ दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी ) एक्स्प्रेस, १२५४१ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस आणि ११०१६ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकात थांबवण्यात येतील. तर, एलटीटी येथून सुटणाºया वाराणसी रत्नागिरी, गोरखपूर व्हाया अलाहाबाद आणि दरभंगा एक्स्प्रेस सुमारे दोन तास विलंबाने मार्गस्थ होतील. ब्लॉक काळात काही मेल-एक्स्प्रेस कल्याण स्थानकात थांबवण्यात येणार असल्याने या एक्स्प्रेस सुमारे तीन तास विलंबाने पुढील प्रवासाला सुरुवात करतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

Web Title: Tomorrow's block on all three routes in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.