ध्‍वनिप्रदूषणाच्‍या तक्रारींसाठी आता टोल फ्री क्रमांक, नागरिकांना १८००२२३४६७ या क्रमांकावर नोंदविता येणार तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 04:33 PM2017-11-07T16:33:40+5:302017-11-07T16:34:01+5:30

मुंबई : ध्‍वनिप्रदूषण निवारण / नियंत्रण, सण / उत्‍सवादरम्‍यान पदपथावर उभारण्‍यात येणा-या अनधिकृत मंडपाच्‍या तक्रारी, अनधिकृत पोस्‍टर्स, बॅनर्सच्‍या तक्रारींकरीता मुंबई  महापालिकेतर्फे विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

Toll free number, citizens can be registered on 1800223467 for noise pollution complaints | ध्‍वनिप्रदूषणाच्‍या तक्रारींसाठी आता टोल फ्री क्रमांक, नागरिकांना १८००२२३४६७ या क्रमांकावर नोंदविता येणार तक्रारी

ध्‍वनिप्रदूषणाच्‍या तक्रारींसाठी आता टोल फ्री क्रमांक, नागरिकांना १८००२२३४६७ या क्रमांकावर नोंदविता येणार तक्रारी

Next

मुंबई : ध्‍वनिप्रदूषण निवारण / नियंत्रण, सण / उत्‍सवादरम्‍यान पदपथावर उभारण्‍यात येणा-या अनधिकृत मंडपाच्‍या तक्रारी, अनधिकृत पोस्‍टर्स, बॅनर्सच्‍या तक्रारींकरीता मुंबई  महापालिकेतर्फे विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.  ध्‍वनिप्रदूषण, रस्‍ते / पदपथांवर अनधिकृत मंडप व अनधिकृत पोस्‍टर्स / जाहिरात फलके याबाबत तक्रारी नोंदविण्‍याची टोल फ्री क्रमांक १८००२२३४६७, इतर क्रमांक १२९२ (MTNL landline तसेच MTNL Mobile वरुन सदर सेवा उपलब्‍ध आहे.

इतर सर्व्हिस प्रोव्‍हायडरकडून सदर सेवा लवकरच उपलब्‍ध होईल (Access for other service providers is in process)), Helpline No. १९१६, SMS / Whatsapp - ९९२०७६०५२५ व Email – mcgm.licnp@gmail.com यावर व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. ध्‍वनिप्रदूषण निवारण व नियंत्रणाकरीता बृहन्‍मुंबईतील सर्व पोलीस ठाणेनिहाय नेमणूक करण्‍यात आलेल्‍या पदनिर्देशित अधिका-यांची यादी तसेच माहिती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या http://portal.mcgm.gov.in (Home  Quick links  more) या संकेतस्‍थळावर या अगोदरच प्रदर्शित करण्‍यात आलेली आहे.

तसेच सण / उत्‍सवादरम्‍यान रस्‍ते, पदपथांवर उभारण्‍यात येणा-या मंडपांच्‍या तक्रारींवर कार्यवाही करणेकामी प्रत्‍येक विभाग कार्यालयात विशेष अधिका-यांची नेमणूक करण्‍यात आलेली आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्‍यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.

Web Title: Toll free number, citizens can be registered on 1800223467 for noise pollution complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.