एसटी कर्मचाऱ्यांचे आज उपोषण; अधिकारीदेखील सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:35 AM2018-10-30T05:35:58+5:302018-10-30T06:31:36+5:30

मुंबई-पुण्यासह राज्यातील एसटी अधिकारी-कर्मचारी मंगळवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी आझाद मैदान येथे उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

Today's hunger strike for ST employees | एसटी कर्मचाऱ्यांचे आज उपोषण; अधिकारीदेखील सहभागी होणार

एसटी कर्मचाऱ्यांचे आज उपोषण; अधिकारीदेखील सहभागी होणार

Next

मुंबई : एसटी महामंडळातील भाडेतत्त्वावरील शिवशाहींसह महामंडळात विविध मार्गाने होणारे खासगीकरण बंद करा या आणि अन्य १२ मागण्यांसाठी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील एसटी अधिकारी-कर्मचारी मंगळवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी आझाद मैदान येथे उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

भाडेतत्त्वावरील शिवशाहीच्या अपघातांमध्ये सतत वाढ होत आहे. भाडेतत्त्वावरील शिवशाहीमधील चालक एसटीतील चालकांइतके प्रशिक्षित नाहीत. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतेसह महामंडळाच्या अन्य कामांत खासगीकरण करण्यात येत आहे. खासगीकरणातून स्थानकांतील स्वच्छता होत नसून उलट कंपन्यांना आर्थिक फायदा होत आहे. यामुळे खासगीकरण बंद करा, अशी मागणी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी केली आहे.
मागण्यांबाबत चर्चा न झाल्यास १ नोव्हेंबरपासून राज्यात विभागीय पातळीवर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिली.

Web Title: Today's hunger strike for ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.