पदवीच्या प्रवेशासाठी आज पहिली गुणवत्ता यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:17 AM2019-06-17T05:17:26+5:302019-06-17T05:17:47+5:30

७,८३,८९६ अर्ज; अडीच लाख विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व नोंदणी

Today's first quality list for graduation | पदवीच्या प्रवेशासाठी आज पहिली गुणवत्ता यादी

पदवीच्या प्रवेशासाठी आज पहिली गुणवत्ता यादी

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया २९ मेपासून सुरू केली होती. यात एकूण २,६२,१२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ७,८३,८९६ एवढे अर्ज आले आहेत. यात वाणिज्य शाखेतील परंपरागत आणि स्वयअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले असून, त्यापाठोपाठ विज्ञान शाखा आणि कला शाखेतील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार सोमवारी सायंकाळी पाच वाजता संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता प्रसिद्ध होणार आहे. कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही १८ ते २० जून २०१९ पर्यंत राहणार आहे.

नोंदणीच्या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई विद्यापीठातर्फे २०१९-२० साठी प्रथमवर्ष बीए, बीएससी, बीकॉम, बीएमएमएम, बीएसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर आॅफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकाउंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएससी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएससी (कॉम्प्युटर सायन्स), बीएससी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएससी (मायक्रोबायोलॉजी), बीएससी (बायो-केमेस्ट्री), बीएससी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएससी (मेरिटाईम), बीएससी (नॉटीकल सायन्स), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स), बीएससी (होम सायन्स), बीएससी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएससी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाउस मॅनेजमेंट, फार्मा अ‍ॅनेलिटिकल सायन्स, टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रवेशपूर्व नावनोंदणीच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ. लीलाधर बन्सोड यांनी सांगितले.

अभ्यासक्रमाचे प्रवेशअर्ज
नाव संख्या
बीए ५५९०७
बीकॉम ७३८८८
(अकाउंट अँड फायनान्स)
बीकॉम २२९४७
(बँकिंग अँड इन्श्युरन्स)
बीकॉम १५०४४
(फायनान्शिअल मार्केट)
बीकॉम २१६८११
बीएमएस १४४१४३
बीएमएम ५१०७९
बीएससी ५७८५९
बीएससी (आयटी) ६२०५८
बीएससी ३४७८७
(कॉम्प्युटर सायन्स)
बीएससी (बायोटेक) १७५३७

Web Title: Today's first quality list for graduation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.