आजपासून मांजरांची नसबंदी, एक कोटीची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:47 AM2019-04-01T03:47:20+5:302019-04-01T03:47:47+5:30

एक कोटीची तरतूद : प्रत्येकी १२०० रुपये खर्च

From today the sterilization of the cat, one crore provision | आजपासून मांजरांची नसबंदी, एक कोटीची तरतूद

आजपासून मांजरांची नसबंदी, एक कोटीची तरतूद

googlenewsNext

मुंबई : मुंबईत भटक्या श्वानांनंतर कबुतरांची उत्पत्ती नियंत्रणात आणण्याच्या हालचाली सुरू असताना आता मांजरांचीही नसबंदी करून प्राणी उत्पत्ती नियंत्रण योजना राबविण्यात येणार आहे. पालिकेच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला भारतीय पशुकल्याण मंडळाने मंजुरी दिली असून १ एप्रिलपासून हा उपक्रम सुरू होणार आहे.

मुंबई शहर उपनगरात मांजरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्वानाच्या तुलनेत मांजरांचे प्रजनन जास्त आहे. मांजरीचे प्रजनन वषार्तून चार वेळा होते. श्वानांचे प्रजनन हे २ वेळा होते. भटकी मांजर ही एका वेळेस सरासरी २ ते ५ पिल्लांना जन्म देते. त्यांची संख्या श्वानांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या नसबंदी प्रकल्पामुळे मांजरांच्या वाढत्या प्रजननाला आळा बसणार असून रोगराई-दुगंर्धी थांबण्यास मदत होणार आहे. मुंबईत मांजरांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिकांना मोठा उपद्रव सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर नगरसेवकांकडून मांजरांचीही नसबंदी करावी अशी मागणी करण्यात येत होती. शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी मांजरांची नसबंदी करावी अशी ठरावाची सूचनाही मांडली होती.

पालिकेने या मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर नसबंदी उपक्रमाअंतर्गत मांजर पकडून आणणे, नसबंदीसाठी दाखल करणे व सोडणे यासाठी एकूण १२०० रुपये खर्च येणार आहे. नसबंदीनंतर सहा ते सात दिवस टाके सुकेपर्यंत सेंटरमध्ये ठेवले जाईल, अशी माहिती पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. जे. सी. खन्ना यांनी दिली.मुंबईत डब्ल्यूएसटी, वेल्फेअर आॅफ स्ट्रे डॉग, बॉम्बे एसपीसीए, आयडिया इंडिपेंडन्स आॅफ अ‍ॅनिमल्स, अहिंसा , मालाड, ‘उत्कर्ष सामाजिक संस्था अशा ठिकाणी मांजरांची नसबंदी केली जाणार आहे.

Web Title: From today the sterilization of the cat, one crore provision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.