आज अतिवृष्टीचा इशारा, ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:18 AM2018-07-15T06:18:17+5:302018-07-15T06:18:26+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी १५ जुलै, रविवारी मुंबई शहरासह उपनगरात अतिवृृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

Today the high alert will be 4.97 meters high | आज अतिवृष्टीचा इशारा, ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार

आज अतिवृष्टीचा इशारा, ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी १५ जुलै, रविवारी मुंबई शहरासह उपनगरात अतिवृृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
समुद्राला मोठी भरती असून, रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास समुद्र किनारी ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. परिणामी, पर्यटकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे. मच्छीमारांनीही समुद्रात मासेमारीसाठी उतरू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
१५ ते १८ जुलैदरम्यान उत्तर कोकणात अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. उत्तर कोकणात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश होता. १५ ते १८ जुलैदरम्यान दक्षिण कोकणात अतिवृष्टी होईल. १६ जुलै रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात अतिवृष्टी होईल.
दरम्यान, १४ जुलै रोजीही मुंबईत अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र, मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पडलेल्या पावसाने दिवसभर मुंबईकडे पाठ फिरविली होती.
>सांताक्रुझमध्ये बैठ्या चाळीच्या भिंतीचा भाग कोसळला
मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. परिणामी, पडझडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
मुंबईत १० ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या.भायखळा पश्चिम येथे म्हाडाच्या अखत्यारित्यातील तीन माळ्याच्या इमारतीचा एका किचनचा भाग पडून, परवीन हसन खान ही महिला जखमी झाली. तिला नायर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.सांताक्रुझ पूर्वेत वाकोला पोलीस ठाण्याजवळ दोन माळ्याच्या बैठ्या चाळीच्या भिंतीचा काही भाग पडल्याने, ३ महिला, २ पुरुष, ३ लहान मुले फसली होती. अग्निशमन दलाने त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
६ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. तर, ८ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या.

Web Title: Today the high alert will be 4.97 meters high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.