शिक्षक भरतीच्या निम्म्या जागा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:30 AM2019-02-07T06:30:44+5:302019-02-07T06:31:01+5:30

एकीकडे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे मात्र शिक्षक भरती पुन्हा लांबवणीवर पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Thousands of recruits are likely to be postponed again | शिक्षक भरतीच्या निम्म्या जागा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

शिक्षक भरतीच्या निम्म्या जागा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

Next

मुंबई - एकीकडे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे मात्र शिक्षक भरती पुन्हा लांबवणीवर पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मराठा आरक्षणामुळे आधीच शिक्षक भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मराठा आरक्षणानंतर तयार करण्यात आलेली भरतीचा रोस्टर तक्ता पुन्हा बदलावा लागला. आता सवर्ण आरक्षण लागू झाल्याने, शिक्षक भरती आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. यामुळे शिक्षक भरतीसाठीच्या उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

राज्यात २००८ नंतर शिक्षक भरती झाली नसून, तब्बल दहा वर्षांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे. या जाहिरातीत भरती प्रक्रियेची पूर्ण माहिती देण्यात येईल. भरती प्रक्रियेत सवर्ण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये असणारे १० टक्के आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे पुन्हा तक्ता बदलावा लागेल की काय, याबाबत उमेदवारांत संभ्रम आहे. सवर्ण आरक्षणाचा तक्ताच बाजूला ठेवून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, असा पर्याय शिक्षण आयुक्तांना आपण दिल्याची माहिती सामान्य अभियोग्यता कल्पेश ठाकरे यांनी दिली.

जागांची अद्याप निश्चिती नाही
शिक्षण विभागाने २४ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी शाळांची शिक्षक भरती त्यांनी घेतलेल्या मुलाखतीनुसार होणार असून, त्यासाठी उमेदवार मात्र शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहेत, पण किती उमेदवार मुलाखतींसाठी द्यायचे हे अद्याप निश्चित नसून त्यावर चर्चा सुरू आहे.
त्यामुळे नेमकी किती जागांसाठी शिक्षक भरती होणार हे गुलदस्त्यातच आहे.

Web Title: Thousands of recruits are likely to be postponed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक