आरटीईच्या तिसऱ्या लॉटरीला मुहूर्त मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:15 AM2018-07-14T06:15:49+5:302018-07-14T06:16:52+5:30

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मुंबईत आरटीई प्रवेशाच्या दुसºया फेरीतील प्रवेश घेण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. दुस-या फेरीनंतर इतका काळ लोटूनही अद्याप तिस-या लॉटरीसाठी शिक्षण विभागाला मुहूर्त मिळालेला नाही.

 The third lottery of the RTE! | आरटीईच्या तिसऱ्या लॉटरीला मुहूर्त मिळेना!

आरटीईच्या तिसऱ्या लॉटरीला मुहूर्त मिळेना!

Next

मुंबई : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मुंबईत आरटीई प्रवेशाच्या दुसºया फेरीतील प्रवेश घेण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. दुस-या फेरीनंतर इतका काळ लोटूनही अद्याप तिस-या लॉटरीसाठी शिक्षण विभागाला मुहूर्त मिळालेला नाही. याची कारणे देताना पालिका शिक्षण विभागाच्या अधिकाºयांकडून टाळाटाळ होत आहे. मात्र अद्यापही राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचे दुसºया फेरीतील तब्ब्ल ५०० हून अधिक प्रवेश बाकी असल्याने तिसºया लॉटरीला मुहूर्त मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची दुसरी सोडत ११ जून रोजी जाहीर झाली. या यादीत २,३८२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ३० जूनपर्यंतच्या पालिका शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, ७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. तर ४० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले होते. ३०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता. तर १२९७ प्रवेशांची माहिती मुख्याध्यापकांकडून अद्ययावत करण्यात आली नव्हती. त्यानंतरही अद्याप ५५०हून अधिक प्रवेशांबाबतची माहिती अद्ययावत केली नसल्याचे समजते.
मुख्याध्यापकांना ही माहिती अद्ययावत कारण्यासाठी १७ जुलैपर्यंत वेळ देण्यात आली असून त्यानंतर किती प्रवेश बाकी आहेत, किती रद्द केले आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल, अशी उडवाउडवीची उत्तरे पालिका शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून देण्यात येत आहेत. मुखाध्यापकांच्या लॉगइनमध्ये शून्य प्रवेश बाकी दाखवत नाहीत तोपर्यंत पुढील लॉटरी शक्य नसल्याचे पालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ शाळाच असहकार करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचा प्रवेशांना खो
दुसºया फेरीतील २३८२ प्रवेशांपैकी तब्ब्ल ५००हून अधिक प्रवेश प्रलंबित असून हे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचे आहेत. याउलट इतर शिक्षण मंडळाच्या शाळांकडून दुसºया फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशांना राज्य शिक्षण मंडळाच्या शाळाच खो देत आहेत की पालिका शिक्षण विभाग त्यांच्याकडून काम करून घेण्यास अपयशी ठरत आहे, असा सवाल तज्ज्ञांकडून उपस्थित होत आहे.

Web Title:  The third lottery of the RTE!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.