अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांच्या नांग्या ठेचणार; आरटीओ, पोलिस अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 09:40 AM2023-11-25T09:40:14+5:302023-11-25T09:40:35+5:30

एसटी महामंडळ उपाध्यक्षांच्या पत्रानंतर आरटीओ, पोलिस अलर्ट मोडवर

The canoes of those who transport passengers illegally will be crushed, RTO | अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांच्या नांग्या ठेचणार; आरटीओ, पोलिस अलर्ट मोडवर

अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांच्या नांग्या ठेचणार; आरटीओ, पोलिस अलर्ट मोडवर

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यात अवैधपणे प्रवासी वाहतूक सुरू आहे. एसटीच्या हद्दीत गाड्या उभा करून एजंट प्रवाशांना बोलावून नेतात. त्यामुळे एसटी वाहतुकीला झळ बसत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ उपाध्यक्षांनी राज्यातील पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांना कारवाईचे आवाहन केले होते. त्यानुसार आरटीओ विभाग आणि पोलिसांकडून कारवाई आणखी कठोर केली जाणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये टप्पे प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आहेत.  काही प्रवासी वाहनांना टप्पा वा वाहतुकीची परवानगी नसताना टप्पा वाहतूक करत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूकसुद्धा करीत आहेत. 

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध प्रवासी वाहतुकीवर बंदी घातली असतानासुद्धा शासन व शासनाचे संबंधित विभागाचे अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे.  आजही लाखो वाहने अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करीत आहेत. शासन व संबंधित विभाग अवैध वाहतूक रोखण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत, असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राज्यात अवैध प्रवासी वाहतूक मोहीम नियमित केली जाते. यापुढे आणखी कठोर तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात येतील. 
- विवेक भिमनवार, 
परिवहन आयुक्त 
एसटी स्थानक परिसरात होत असलेल्या अवैधपणे प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल 
-एम. रामकुमार, अपर पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

एसटी महामंडळाचे उत्पन्न कमी होण्याला निव्वळ खासगी अवैध वाहतूक व शासनाच्या परवानगीने सुरू असलेली खासगी वाहतूक जबाबदार आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनधिकृत वाहनांना पोलिस व आरटीओ या दोघांचे अभय आहे. त्यांचे लागेबांधे असल्याने अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचप्रमाणे अपघातही वाढले आहेत.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
भारक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्यास चालकाचे वाहनावरील नियंत्रण कमी होते. अवैध प्रवासी वाहतुकीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. एकसोबत जास्त अपघाती मृत्यू होणाऱ्या घटनांमध्ये अनेकदा अवैध प्रवासी वाहतूक असते. कित्येकदा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांतूनही प्रवासी वाहतूक होते. यावर आरटीओ आणि पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. 
- संदीप गायकवाड, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था

महामार्ग पोलिस अपघात अहवाल २०२२
वाहन प्रकार        अपघाती मृत्यू 
तीनचाकी         ४४७
कार         २२२१
बस         ११९

 

Web Title: The canoes of those who transport passengers illegally will be crushed, RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.