The suspected terrorists had created a plot of chemical attack across the country | संशयित अतिरेक्यांनी रचला होता देशभरात रासायनिक हल्ल्यांचा कट
संशयित अतिरेक्यांनी रचला होता देशभरात रासायनिक हल्ल्यांचा कट

मुंबई/औरंगाबाद : एटीएसने अटक केलेल्या ९ संशयित अतिरेक्यांनी इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित होऊन उम्मत-ए-मोहम्मदिया नावाचा गट तयार केला होता. उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्यासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी रासायनिक हल्ला करण्याचा कट त्यांनी आखल्याची माहिती एटीएसच्या चौकशीत समोर आली आहे. कुंभमेळ्याच्या आयोजकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
अटक केलेल्या ८ जणांना बुधवारी औरंगाबाद येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.
संशयित अतिरेक्यांपैकी एक जण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक राशीद मलबारी याचा मुलगा आहे. मजहर अब्दुल रशिद शेख (२१), मो. तकी उर्फ अबु खालीद सिराजउद्दीन खान (२०), मो. मुशाहिद उल इस्लाम (२३), मो. सर्फराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२०) जमान नवाब कुटेपड (३२),सलमान सिराजउद्दीन (२८), फहाज सिराजउद्दीन (२८) मोहसीन सिराजोद्दीन (३२) अशी त्यांची नावे असून त्यातील काही जण फार्मासिस्ट तर काही इंजिनिअर आहेत. एक अल्पवयीन असून, तो अकरावी विज्ञान शाखेत (पान ५ वर)(पान १ वरून) राशीद मलबारी याचा मुलगा आहे. मजहर अब्दुल रशिद शेख (२१), मो. तकी उर्फ अबु खालीद सिराजउद्दीन खान (२०), मो. मुशाहिद उल इस्लाम (२३), मो. सर्फराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२०) जमान नवाब कुटेपड (३२),सलमान सिराजउद्दीन (२८), फहाज सिराजउद्दीन (२८) मोहसीन सिराजोद्दीन (३२) अशी त्यांची नावे असून त्यातील काही जण फार्मासिस्ट तर काही इंजिनिअर आहेत. एक अल्पवयीन असून, तो अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत. त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
एक जण थेट इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसल्ली मिळाली होती. त्यानुसार, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. अटक केलेल्यांपैकी ३ जण हे सख्खे भाऊ आहेत. तर अन्य त्यांचे मित्र आहेत. घटनास्थळावरून हायड्रोजन पेरॉक्साईडसह विविध रसायने व पावडर जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी औरंगाबाद आणि मुंब्रामध्ये घरातच प्रयोगशाळा सुरु केली होती. तित विविध घातक रसायन एकत्र करण्यात येत होते.


Web Title: The suspected terrorists had created a plot of chemical attack across the country
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.