वरिष्ठांच्या आधारामुळे ‘त्या’ २१२ लाचखोरांची खुर्ची सुटेना; आतापर्यंत १ हजार १०९ आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 10:48 AM2024-02-01T10:48:40+5:302024-02-01T10:52:16+5:30

नागपूरमध्ये सर्वाधिक ६१ घटनांची नोंद.

Support of the seniors those 212 bribes increased about 1109 bribe taker are arresteerd by police | वरिष्ठांच्या आधारामुळे ‘त्या’ २१२ लाचखोरांची खुर्ची सुटेना; आतापर्यंत १ हजार १०९ आरोपी अटकेत

वरिष्ठांच्या आधारामुळे ‘त्या’ २१२ लाचखोरांची खुर्ची सुटेना; आतापर्यंत १ हजार १०९ आरोपी अटकेत

मुंबई : लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांंवर निलंबन, बडतर्फची कारवाई करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याची धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. राज्यभरातील २१२ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत. यामध्ये नागपूरच्या लाचखोरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

गेल्या वर्षी लाचखोरीप्रकरणी राज्यात ७९५ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये सापळा कारवाईत १ हजार १०९ आरोपी अडकले. यामध्ये मुंबईतील ३६ कारवायांमध्ये ४६ आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारीत ४२  सापळा कारवाईत ६४ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे हे लाचखोर वर्षानुवर्षे तेथेच चिटकून आहेत. २०१३ पासून आतापर्यंत लाचखोरीप्रकरणी कारवाई होऊनदेखील २१२ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. 

लाचखोरांना आणखी बळ :

यात, सर्वाधिक नागपूर (६१) परिक्षेत्रातील, त्यापाठोपाठ मुंबईतील ३५ जणांचा समावेश आहे. त्यातही ग्राम विकास (७१), शिक्षण, क्रीडा (४३), महसूल नोंदणी/भूमी अभिलेख (१७), सहकार पणन व वस्त्रोद्योग (६), नगर विकास (२९) आणि पोलिस होमगार्ड आणि कारागृह विभागातील (१७) जणांचा समावेश आहे. तर अन्य विभागांतील प्रत्येकी १ ते ४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे यांच्यावर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाई दाखविण्यासाठी काहींची बदली करण्यात आली आहे. लाचखोरीच्या प्रकरणात अडकूनही कारवाई होत नसल्याने लाचखोरांना आणखी बळ मिळत असल्याचे दिसून येते.

कोणत्या परिक्षेत्रातील किती लाचखोर खुर्चीत?

परिक्षेत्र            लाचखोर 
मुंबई                    ३५ 
ठाणे                     १७ 
पुणे                      ०८ 
नाशिक                १३ 
नागपूर                 ६१ 
अमरावती             ३८ 
औरंगाबाद            २३ 
नांदेड    १७ 

कोणत्या विभागाचे किती? 

ग्राम विकास ५९, शिक्षण ४८, महसूल १८, पोलिस १८, सहकार पणन ६, नगर विकास २७, उद्योग/ऊर्जा व कामगार विभाग ३, आरोग्य ४, विधी व न्याय १, वने १, नगर परिषद २, समाज कल्याण १, कृषी ४, वित्त व विक्रीकर १, परिवहन ३, अन्न व नागरी पुरवठा ०, आदिवासी १, गृहनिर्माण ३, अन्न व औषधी द्रव्ये १ यांचा समावेश आहे.

Web Title: Support of the seniors those 212 bribes increased about 1109 bribe taker are arresteerd by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.