शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनील प्रभू गोंधळात टाकतायेत; शिंदे गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 06:39 PM2023-11-23T18:39:02+5:302023-11-23T18:39:31+5:30

आरोप करणारेच दिरंगाई करताना दिसतायेत. त्यातून ही सुनावणी आणखी लांबेल असा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप शिरसाट यांनी केला. 

Sunil Prabhu stirs confusion over Shiv Sena MLA disqualification; Shinde group MLA Sanjay Shirsat claim | शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनील प्रभू गोंधळात टाकतायेत; शिंदे गटाचा दावा

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनील प्रभू गोंधळात टाकतायेत; शिंदे गटाचा दावा

मुंबई - शिवसेना आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाने ३१ डिसेंबरपर्यंत निकाल लावा असा आदेशच विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून आता आमदार अपात्रतेची सलग सुनावणी घेण्यात येत आहे. आजही आमदार अपात्रतेची सुनावणी झाली. या सुनावणीत ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे गोंधळात टाकतायेत असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांसमोर जबाबात सुनील प्रभू यांची वेगवेगळी विधाने गोंधळात टाकणारी आहेत. त्यामुळे त्यांना नेमकी माहिती नाही हे दिसून येते. प्रश्न विचारल्यानंतर उत्तराची व्याप्ती वाढवण्याचा केविळवाणा प्रयत्न प्रभू करतायेत. व्हिपबाबत जो खुलासा त्यांनी दिला तो समाधानकारक वाटत नाही. मेल आणि व्हॉट्सअपवर पाठवलेल्या व्हिपचे कुठेही पुरावे दिले नाहीत. याबाबत पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. आरोप करणारेच दिरंगाई करताना दिसतायेत. त्यातून ही सुनावणी आणखी लांबेल असा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप शिरसाट यांनी केला. 

तसेच सुनील प्रभू यांना त्या गोष्टीचे ज्ञान आहे की नाही, किंवा हे सगळे कागदपत्रे त्यांनी बनावटरितीने तयार केलेली आहेत. त्यामुळे प्रश्नाला उत्तरे देताना त्यांना अडचणी येतायेत. त्यामुळे जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते नेमकं उत्तर देणे टाळतायेत. अध्यक्षांनीही प्रभू यांना तेच सांगितले. परंतु उत्तरे देता येत असल्याने ते लांबवण्याचा प्रयत्न केला. सुनील प्रभू यांनी ज्या व्हिपच्या आधारे अपात्रतेची मागणी केली तो व्हिपच मूळात बनावट आहे. तो कुणाला पोहचलाच नाही हे आम्ही वारंवार सांगतोय. या १६ आमदारांमध्ये माझेही नाव असल्याने मलाही तो व्हिप मिळाला नाही. आम्ही हे सुप्रीम कोर्ट,निवडणूक आयोग सगळीकडे सांगितले आहे. त्यामुळे आता या व्हिपबाबत खुलासा करताना सुनील प्रभू यांची दमछाक होतेय असंही शिरसाट यांनी म्हटलं. 

दरम्यान, खोटे पुरावे दाखल करण्याचा जो ठाकरे गटाचा प्रयत्न आहे तो उघडकीस आला आहे. एखादा व्हिप व्हॉट्सअपवर पाठवले असतील तर तुम्ही त्याचे पुरावे दाखवायला हवेत.परंतु ते दाखवले जात नाही. रोज स्वप्ने पडतायेत. त्याआधारे ३१ डिसेंबरपर्यंत सरकार पडतंय अशी विधाने करतायेत. सुनावणी कशी घ्यायची हा अध्यक्षांचा अधिकार आहे त्यावर बोलणे उचित नाही. सुनावणीवेळी सुनील प्रभू यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नीटपणे दिली जात नाहीत असंही शिरसाट यांनी सांगितले. 

Web Title: Sunil Prabhu stirs confusion over Shiv Sena MLA disqualification; Shinde group MLA Sanjay Shirsat claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.