आंदोलन करून विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण मुंबई विद्यापीठाला नाही - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 12:47 PM2017-09-01T12:47:39+5:302017-09-01T12:55:23+5:30

'मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी. आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही. टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही', असं आदित्य ठाकरे बोलले आहेत. 

Student organizations are feeling ashamed by the agitation but not to the University of Mumbai - Aditya Thackeray | आंदोलन करून विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण मुंबई विद्यापीठाला नाही - आदित्य ठाकरे

आंदोलन करून विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण मुंबई विद्यापीठाला नाही - आदित्य ठाकरे

Next
ठळक मुद्देयुवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कारभारावार जोरदार टीका केली आहेआंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहेमुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे

मुंबई, दि. 1 -  युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कारभारावार जोरदार टीका केली आहे. आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाला खडे बोल सुनावले आहेत. तसंच  मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडता सलग तीन ट्विट केले आहेत. 'मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी. आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही. टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही', असं आदित्य ठाकरे बोलले आहेत. 



तसंच 'हा घोटाळा आहे की नाही, ह्याची चौकशी कधी होणार? चौकशी, क्लीन चीट हातात तयार ठेऊन नाही झाली तर उत्तम...', असा खोचक टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.  

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकली आहे. उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी यापूर्वी पाच वेळा मुदतवाढ घेऊनही दिलेल्या वेळेत निकाल लावण्यात विद्यापीठाला अपयश आले. सहाव्यांदा मुदतवाढ घेताना विद्यापीठाने गणेशोत्सव व २९ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसाची सबब पुढे केली आहे. मात्र विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने न्यायालयाने सीईटी विभागाला लॉ सीईटीची मुदत ६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी पदवी अभ्यासक्रमाचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होणार होते. मात्र दिलेले आश्वासन मुंबई विद्यापीठ पूर्ण करू शकले नाही. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधि अभ्यासक्रमाचे तीन विद्यार्थी व अन्य काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. 

गेल्या सुनावणीत न्यायालयाने विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत वेळ दिली होती. तर सीईटी विभागाने स्वत:हून लॉ सीईटीसाठी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत विद्यापीठ मूल्यांकनाचे काम पूर्ण करू शकले नाही. गणेशोत्सव आणि मंगळवारी शहरात पाणी साचल्याने मूल्यांकनाचे काम पुन्हा मागे पडले आहे. ते पूर्ण करण्यासाठी काही दिवस लागतील, असे विद्यापीठाचे वकील रुई रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यावर न्यायालयाने सीईटी विभागाला लॉ सीईटीची मुदत ६ सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

नवे संकेतस्थळ : गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील निकाल पाहण्यात अडचणी येत असल्याने विद्यापीठाने गुरूवारी नवीन संकेतस्थळाची घोषणा केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संकेतस्थळावर निकाल जाहीर होऊनही अनेक विद्यार्थ्यांना ते दिसत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. परिणामी, विद्यार्थ्यांची तक्रार दूर करण्यासाठी परीक्षा विभागाने www.mumresults.in हे नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. मात्र नव्या संकेतस्थळावर गेल्या दोन दिवसांत जाहीर झालेले निकाल दिसत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांमधून होत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या निकालातील गोंधळ कायम आहे. प्रशासनाने गुरूवारी एकूण ३ निकाल जाहीर केले असले, तरी ४७७ निकालांमधील अद्याप ४४७ निकालच जाहीर झालेले आहेत. त्यामुळे उरलेले ३० निकाल किती दिवसांत लावणार? याबाबतचे उत्तर देण्यास विद्यापीठातील अधिकारी तयार नाहीत.
 

Web Title: Student organizations are feeling ashamed by the agitation but not to the University of Mumbai - Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.