शहरीकरणामुळे पक्ष्यांनी बदलले आपले घर, शहरातून चिमण्या होतायत हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 04:39 AM2019-03-20T04:39:35+5:302019-03-20T04:40:15+5:30

वाढते औद्योगिकीकरण, तापमानात होणारे बदल, सततची होणारी वृक्षतोड व मानवांच्या राहणीमानातील बदलामुळे एकीकडे चिमण्या लुप्त होतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

sparrows out from the city | शहरीकरणामुळे पक्ष्यांनी बदलले आपले घर, शहरातून चिमण्या होतायत हद्दपार

शहरीकरणामुळे पक्ष्यांनी बदलले आपले घर, शहरातून चिमण्या होतायत हद्दपार

Next

- सागर नेवरेकर
मुंबई - वाढते औद्योगिकीकरण, तापमानात होणारे बदल, सततची होणारी वृक्षतोड व मानवांच्या राहणीमानातील बदलामुळे एकीकडे चिमण्या लुप्त होतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढत आहे. माणसासह पक्षी सुद्धा या उकाड्याने हैराण झाले आहेत. शहरामध्ये सिमेंटच्या घरांवर पक्ष्यांना घरटी बांधणे शक्य नसल्याने याचा सर्वाधिक फटका चिमण्यांवर बसला आहे. परिणामी शहरातून चिमण्या हळूहळू हद्दपार होत असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

चिमण्यांना खायला-प्यायला व्यवस्थित मिळाले तर चिमण्यांच्या अंड्यांची संख्या वाढते. आणि साहजिकच चिमण्यांची संख्या वाढेल. उन्हाळ््यात पाणी, अन्न मिळणार का? याचा मागोवा पक्षी आधीच घेतात. त्यानुसार चिमण्या त्यांच्या राहणीमानात बदल करतात. याचा परिणाम हा चिमण्यांच्या अंड्यावरही होतो. शहरातील चिमण्या कमी होण्याच्या पाठीमागे मुख्य कारण म्हणजे सिमेंटची घरे. पूर्वी कौलारू घरामध्ये चिमण्या घरटी करून राहत होते. परंतु आता सिमेंटच्या घरामध्ये घरटे बांधणे शक्य नसल्यामुळे शहरातून चिमण्या हद्दपार होताना दिसत आहेत, अशी माहिती चिवचिव मंडळचे अध्यक्ष गोपाल खाडे यांनी दिली. प्लॅस्टिकच्या अति वापराचा परिणाम चिमण्यांवर होऊ लागला आहे.

एक लाखापेक्षा जास्त कृत्रिम घरटी

स्पॅरोज शेल्टर’ ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून चिमण्यांची व इतर छोट्या पक्ष्यांची ‘कृत्रिम घरटी’ शास्त्रीय आधाराने तयार करून शहरातील वसाहती, ग्रीन झोन, महापालिका उद्यान, वॉटर पार्क, मॉल तसेच शहरातील विविध ठिकाणी लावून चिमण्यांचे संसार कृत्रिम घरट्यात सुरक्षितपणे थाटण्यात मोलाचे काम करत आहे. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त कृत्रिम घरटी शहराच्या विविध भागात लावण्यात आली आहेत. तसेच शहरातील जखमी पक्ष्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येतो.
- प्रमोद माने, अध्यक्ष, स्पॅरोज शेल्टर संस्था

Web Title: sparrows out from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.