मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या राम कदमांचा सोशल मीडियाकडून समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:12 AM2018-09-05T09:12:40+5:302018-09-05T09:16:00+5:30

फेसबुक, व्हॉट्स अॅपवर राम कदम यांची खिल्ली

social media slams bjp mla ram kadam for his controversial statement about women | मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या राम कदमांचा सोशल मीडियाकडून समाचार

मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या राम कदमांचा सोशल मीडियाकडून समाचार

Next

मुंबई: मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली आहे. विरोधकांनी राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतल्यावर आता सोशल मीडियानं राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुक, व्हॉट्स अॅपवर राम कदम यांच्या विधानाची खिल्ली उडवण्यात येत आहे. राम कदम यांच्यावरील विनोद मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

भाजपा आमदार राम कदम सोमवारी घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानाचा सोशल मीडियानं खरपूस समाचार घेतला आहे. 

 

Web Title: social media slams bjp mla ram kadam for his controversial statement about women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.