... त्यामुळे माझं भाषण थांबवलं, अमोल पालेकरांनी 'खरं कारण' सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 03:21 PM2019-02-10T15:21:32+5:302019-02-10T15:22:50+5:30

मुंबईत शनिवारी (9 फेब्रुवारी) एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांना या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला.

... so my speech stopped, Amol Palekar told 'the real reason' in media | ... त्यामुळे माझं भाषण थांबवलं, अमोल पालेकरांनी 'खरं कारण' सांगितलं

... त्यामुळे माझं भाषण थांबवलं, अमोल पालेकरांनी 'खरं कारण' सांगितलं

googlenewsNext

मुंबई - सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याची घटना घडली होती. या संतापजनक प्रकाराबद्दल अमोल पालेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रभाकर बर्वे या चित्रकाराच्या प्रदर्शनासाठी मी नॅशनल गॅलरी ऑफ ऑर्ट येथे गेलो होतो. त्यावेळी मी काय बोलावे किंवा नाही, हा माझा मुद्दा आहे. पण, मी आर्ट गॅलरीबद्दलचा बोलत होतो, तरीही मला थांबविण्यात आल्याचं पालेकर यांनी म्हटलं. 

मुंबईत शनिवारी (9 फेब्रुवारी) एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांना या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एका निर्णयाविरोद्ध आपली भूमिका मांडली होती, त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना आपले मत मांडण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले. तर, भाषण लवकर संपवण्यासही सांगितले होते. सरकारी प्रतिनिधीच्या या प्रकाराबद्दल

एखाद्या वक्त्याला तुम्ही अगोदरच सांगायला पाहिजे, की काय बोलायचं आणि काय नाही. त्यामुळे हे किंवा ते बोलू नका, असं सांगणं चुकीचं आहे. एनजीएमए संस्था आणि त्यामध्ये झालेले बदल याबद्दल बोलणे हे चुकीचं कसं ठरेल. या संग्रहालयात प्रभाकर बर्वेंचं प्रदर्शन हे कदाचित शेवटचं प्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे. कारण, आता ज्या नवीन डिरेक्टर आल्या आहेत. त्यांच्या धोरणानुसार, त्यामध्ये चार मजले हे एनजीएमएच्या कलेक्शनसाठी वापरायचे आणि उर्वरीत एक मजला इतर प्रदर्शनासाठी देण्याचा निर्णय झाल्याची मला माहिती आहे. त्यामुळे मला आणि माझ्यासारख्या कलावंतांना हा मोठा धक्का असल्याचं पालेकर यांनी म्हटलं. तसेच पूर्वनियोजत दोन विख्यात कलाकारांचे प्रदर्शनही ऐनवेळी रद्द करण्यात आले आहेत, मी त्याबद्दलच बोलत होतो, असेही पालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  


शनिवारी अमोल पालेकर 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट'द्वारे आयोजित कार्यक्रमास संबोधित करत होते. सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणादरम्यान पालेकर म्हणाले की, कशा पद्धतीने वर्तमान काळात आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य गमावलंय. शिवाय, त्यांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

यादरम्यान, पालेकरांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे. पण, आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी कार्यक्रमात सांगितले.
 

Web Title: ... so my speech stopped, Amol Palekar told 'the real reason' in media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.