Slap collapses at Bandra; Mother and son injured | वांद्रे येथे स्लॅप कोसळला; आई आणि मुलगा जखमी
वांद्रे येथे स्लॅप कोसळला; आई आणि मुलगा जखमी

मुंबई - मुंबईमध्ये वांद्रे येथील शासकीय वसाहतीमध्ये स्लॅप कोसळून दुर्घटना घडली. आज पहाटे ४:३० वाजता इमारतीतील घराचे  स्लॅप कोसळून आई आणि 8 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. त्यांच्यावर जवळच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शासकीय वसाहतींचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आज सकाळी वांद्र्याच्या शासकीय वसाहतीमधील बी/295/5 या इमारतीत स्लॅप कोसळला. या दुर्घटनेत वैशाली सावंत (वय - ३२) आणि नैतिक सावंत (वय - 8) जखमी झाले आहेत. सकाळी कुटुंब झोपेत होतं. त्याचवेळी ही घटना घडली आहे. या दोघांवरही वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहे. काही दिवसांपूर्वी वरळीच्या पोलिस वसाहतीत स्लॅप कोसळून एका महिलेला नऊ टाके पडले होते. त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे शासकीय वसाहती किती सुरक्षित आहे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, स्थानिक नगरसेविका रोहिणी कांबळे यांना कळताच त्वरित घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना भाभा रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व अधीक्षक डॉक्टरांना भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक अनिल त्रिंबककरदेखील उपस्थित होते.

  


Web Title: Slap collapses at Bandra; Mother and son injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.