साहेब, म्हाडाच्या घराचा ताबा कधी देणार? गृहप्रवेशाला मुहूर्त मिळेना; विजेत्यांच्या पदरी निराशा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 07:50 AM2023-11-05T07:50:17+5:302023-11-05T07:50:28+5:30

म्हाडाने सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढली होती. यातील बहुतांश घरे ही गोरेगाव पहाडी येथील आहेत

Sir, when will you give possession of Mhada's house? No time to enter home; Disappointment in the winner's row | साहेब, म्हाडाच्या घराचा ताबा कधी देणार? गृहप्रवेशाला मुहूर्त मिळेना; विजेत्यांच्या पदरी निराशा

साहेब, म्हाडाच्या घराचा ताबा कधी देणार? गृहप्रवेशाला मुहूर्त मिळेना; विजेत्यांच्या पदरी निराशा

मुंबई : म्हाडाच्यावतीने काढण्यात आलेल्या मुंबई मंडळाच्या लॉटरीतील घरांचा ताबा पैसे भरल्यानंतर दसऱ्यापर्यंत दिला जाईल, असा दावा प्राधिकरणाने केला होता. दिवाळी तोंडावर आली तरी अद्याप विजेत्यांना घरे देण्याबाबत म्हाडाने सज्जता दाखविलेली नाही.

घराची २५ टक्के रक्कम भरण्यापासून बँकेचे कर्ज काढण्यासाठी धावपळ केलेल्या विजेत्या अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. म्हाडाने सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढली होती. यातील बहुतांश घरे ही गोरेगाव पहाडी येथील आहेत. विजेत्या अर्जदाराने पूर्ण रक्कम भरली, तर त्याला त्वरित घराचा ताबा दिला जाईल, असा दावा म्हाडाने लॉटरीदरम्यान केला होता. 

मुहूर्तही हुकला
  घरांच्या अव्वाच्या सव्वा किमती, बँकांकडून कर्ज मिळण्यास विलंब, २५ टक्के रक्कम भरण्यास येणाऱ्या अडथळ्यांमुळे एकाही अर्जदाराला पूर्ण रक्कम भरणे अशक्य. हप्ते सुरू झाले तरीही ताबा नाही. 
  घराची १०० टक्के रक्कम भरणाऱ्या विजेत्या अर्जदाराला दसऱ्याच्या मुहूर्तावर घराचा ताबा मिळेल, असे सांगितले होते.

विजेत्यांची प्राधिकरणावर नाराजी
तात्पुरते देकारपत्र मिळाल्यानंतर १०० टक्के रक्कम भरणाऱ्या विजेत्याला १५ दिवसांत चावी दिली जाईल, असा दावा म्हाडा करत होते. मात्र आता १०० टक्के रक्कम भरणाऱ्या अर्जदारांची संख्या तुलनेने कमी असली तरी संबंधितांचे बँकेचे हप्ते सुरू झाले आहेत. असे असताना म्हाडाकडून गृहप्रवेशाचे मुहूर्त चुकत असल्याने विजेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Sir, when will you give possession of Mhada's house? No time to enter home; Disappointment in the winner's row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा