दुकानदारांनो, १५ दिवसांत मराठी नामफलक लावा; मनसेचा खळ्ळ्खट्ट्याकचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:15 AM2019-01-29T01:15:44+5:302019-01-29T06:44:14+5:30

लालबाग, परळमधील दुकानदारांना दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Shoppers, take 15 minutes to name Marathi; MNS's vicious hint | दुकानदारांनो, १५ दिवसांत मराठी नामफलक लावा; मनसेचा खळ्ळ्खट्ट्याकचा इशारा

दुकानदारांनो, १५ दिवसांत मराठी नामफलक लावा; मनसेचा खळ्ळ्खट्ट्याकचा इशारा

Next

मुंबई : दुकानांवर इंग्रजी भाषेतील अक्षरांएवढीच मराठी भाषेतील अक्षरांची पाटी लावण्याचा इशारा मनसेने लालबाग व परळमधील दुकानदारांना दिला आहे. यासंदर्भातील महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमाची प्रत आणि निवेदन देत १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

याबाबत मनसेचे शाखाध्यक्ष नीलेश इंदप म्हणाले की, परळ व लालबाग परिसरात बऱ्याच नामांकित व ब्रँडेड वस्तूंची दुकाने व आस्थापने आहेत. मात्र या आस्थापनांवर लावण्यात येणाºया नामफलकांत इंग्रजी अक्षरांचा आकार मोठा असतो. याउलट नामफलकावरील मराठी नावांतील अक्षरांचा आकार खूपच लहान असतो. राज्य शासनाच्या नियमानुसार दुकाने व आस्थापनांवरील मराठी भाषा व इतर भाषेतील अक्षरांचा आकार समान असावा. तरी दुकानदारांनी तत्काळ दुकानांवरील दोन्ही भाषेंतील नामफलक हे समान आकाराचे व देवनागरी भाषेत लावण्याचे आवाहन करणारे निवेदन दुकानदारांना दिले आहे. त्यामुळे दुकानदारांनी त्यांचे नामफलक येत्या १५ दिवसांत बदलून घेण्याचे आवाहन मनसेने केले आहे. तसेच शासनानेही १५ दिवसांत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाहीतर, मनसे स्टाइलने दुकानदारांना उत्तर दिले जाईल, असेही इंदप म्हणाले.

नियम काय सांगतो?
प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा देवनागरी लिपीत असावा.
मराठीतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे.
मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.

Web Title: Shoppers, take 15 minutes to name Marathi; MNS's vicious hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.