धक्कादायक! मुंबईत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूहल्ला, व्हिडीओ क्लिपवरुन करत होता ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 12:44 PM2017-10-22T12:44:24+5:302017-10-22T12:47:01+5:30

छेडछाडीचा जाब विचारला म्हणून अल्पवयीन मुलीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता विक्रोळीमध्ये एका विवाहित महिलेवर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे.

Shocking Blackmail through the one-on-one love affair in Mumbai, on the basis of marriage, video clips | धक्कादायक! मुंबईत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूहल्ला, व्हिडीओ क्लिपवरुन करत होता ब्लॅकमेल

धक्कादायक! मुंबईत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूहल्ला, व्हिडीओ क्लिपवरुन करत होता ब्लॅकमेल

Next

मुंबई - दिल्लीप्रमाणे आता मुंबई शहरही महिलांसाठी असुरक्षित बनत चालले आहे. छेडछाडीचा जाब विचारला म्हणून अल्पवयीन मुलीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता विक्रोळीमध्ये एका विवाहित महिलेवर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार आरोपीने पीडित महिलेच्या ऑफीसमध्ये जाऊन तिच्यावर चाकू हल्ला केला. पीडित महिला विक्रोळीच्या तिच्या ऑफीसमध्ये असताना आरोपी सावीर हसन मोहम्मद खान तिथे आला व त्याने वाद घालायला सुरुवात केली. 

पीडित महिला सावीरला खेचून ऑफीसमधून बाहेर काढत असताना सावीरने त्याच्या जवळच्या चाकू काढला व महिलेवर वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला 33 टाके पडले आहेत. तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावीर खान वाकोला येथे राहतो. एकतर्फी प्रेमातून त्याने हा हल्ला केला. काही दिवसांपासून सावीर या महिलेला व्हिडीओ क्लिप्सवरुन ब्लॅकमेल करत होता. 

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्थानिकांनी पकडून हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. कलम 307 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडित महिलेने एकत्र काम केले होते. त्यावेळी आरोपी तिच्या प्रेमात पडला. मंगळवारी छेडछाडीचा जाब विचारला म्हणून एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला सर्वांसमक्ष बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. कुर्ला नेहरुनगर येथे हा प्रकार घडला. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सर्वांसमक्ष तरुणीला मारहाण करत होता. अनेकजण ही घटना पाहत होते. पण कोणीही मध्ये हस्तक्षेप करुन या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ही तरुणी बेशुद्ध होऊन खाली कोसळेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. 

मंगळवारी संध्याकाळी ही तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणीसोबत शिलाईच्या शिकवणी वर्गाला जात होती. त्यावेळी त्याच इमारतीत राहणा-या इमरान शाहीद शेखने तिला पाहून एक कमेंट केली. तरुणीला त्याचे शब्द ऐकून राग आला तिले त्याला जाब विचारला. त्यावर चिडलेल्या इमरानने तिच्या कानाखाली मारली तसेच तिला बुक्के मारले. तरुणी बेशुद्ध होऊन खाली कोसळेपर्यंत इमरानने तिला मारहाण केली. 

Web Title: Shocking Blackmail through the one-on-one love affair in Mumbai, on the basis of marriage, video clips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा