Shivsena Dasara Melava 2018 : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 08:48 PM2018-10-18T20:48:48+5:302018-10-18T20:49:38+5:30

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. तसेच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन राम मंदिरांबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Shivsena Dasara Melava 2018 : Uddhav Thackeray will visit Ayodhya on 25th November | Shivsena Dasara Melava 2018 : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

Shivsena Dasara Melava 2018 : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

Next

मुंबई -  राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. तसेच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन राम मंदिरांबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यादरम्यान शिवसैनिकांना संबोधित करताना केली. 

आज  दसरा मेळाव्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, दुष्काळ, दहशतवाद या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेतले. तसेच भाजपासाठी अस्मितेचा मुद्दा असलेल्या राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघात केला."सरकारच्या विविध घोषणा हे जुमले ठरत आहेत. मात्र राम मंदिराचा मुद्दाही जुमला असेल तर या सरकारच्या डीएनएमध्येच दोष आहे. सरकारला राम मंदिर बांधणे शक्य होत असेल तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू, आज राम मंदिराबाबत इथून जे बोलत आहे. तेच प्रश्न येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारणार आहे, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. 

Web Title: Shivsena Dasara Melava 2018 : Uddhav Thackeray will visit Ayodhya on 25th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.