गोरेगाव हार्बर लोकलच्या उदघाटनाच्या निमित्ताने सेना-भाजपाच्या शक्तिप्रदर्शनाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 08:40 PM2018-03-28T20:40:27+5:302018-03-28T20:51:08+5:30

जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या मधील उभारलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी तात्कातीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सेना व भाजपाने जोरदार घोषणाबाजी करून शक्ति प्रदर्शन केले होते, त्यामुळे घोषणाबाजीत हा उदघाटन सोहळा आटोपता घ्यावा लागला होता.त्यामुळे उद्या देखिल हार्बर रेल्वेच्या उदघाटन प्रसंगी सेना आणि भाजप कार्यकर्ते जोरदार शक्ति प्रदर्शन व घोषणाबाजी करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Shivsena-BJP political War News | गोरेगाव हार्बर लोकलच्या उदघाटनाच्या निमित्ताने सेना-भाजपाच्या शक्तिप्रदर्शनाची शक्यता

गोरेगाव हार्बर लोकलच्या उदघाटनाच्या निमित्ताने सेना-भाजपाच्या शक्तिप्रदर्शनाची शक्यता

Next

-  मनोहर कुंभेजकर
मुंबई - गोरेगाव हार्बर लोकलच्या उदघाटनाच्या निमित्याने सेना भाजपामध्ये  शक्तिप्रदर्शन रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या मार्गावर हार्बर रेल्वे सुरू होत नसल्यामुळे गोरेगावकरांमध्ये नाराजी होती.अखेर याला पूर्णविराम मिळाला आहे. गुरुवारी दि,29 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोरेगाव हार्बर लोकलचे गोरेगाव रेल्वे स्थानकात उदघाटन होणार आहे.

जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या मधील उभारलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी तात्कातीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सेना व भाजपाने जोरदार घोषणाबाजी करून शक्ति प्रदर्शन केले होते, त्यामुळ घोषणाबाजीत हा उदघाटन सोहळा आटोपता घ्यावा लागला होता.त्यामुळे उद्या देखिल हार्बर रेल्वेच्या उदघाटन प्रसंगी सेना आणि भाजप कार्यकर्ते जोरदार शक्ति प्रदर्शन व घोषणाबाजी करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
"प्रॉमिस फुलफिल,गुड न्युज फॉर गोरेगावकर" असा मथळा देऊन महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे चिरंजीव व भाजपा वॉर्ड क्रमांक 50 चे नगरसेवक दीपक ठाकूर यांनी सोशल मीडियावरून या उदघाटनाचे निमंत्रण पाठवले आहे.तर भाजपा आणि सेना यांनी श्रेय घेण्यासाठी उदघाटनाची फलक बाजी करणारी बॅनरबाजी देखिल केली आहे.
 गोरेगाव पर्यंत हार्बर रेल्वे चा विस्तार करण्यात यावा यासाठी गेली अनेक वर्षे मी व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीे काय प्रयत्न केले आहेत हे तमाम गोरेगावकरांना चांगले माहिती आहे.तर आपण खासदार म्हणून या रेल्वेच्या विस्तारिकरणासाठी काय प्रयन्त केले याचा लेखा जोखाच मांडण्यासाठी खास हँडबील तयार केल्याची माहिती खासदार कीर्तिकर यांनी दिली.
तर माजी केंद्रीय रेल्वे मंत्री व उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व विद्या ठाकूर यांनी यासाठी किरी अथक प्रयत्न केले हे तमाम गोरेगावकर चांगलेच जाणतात असा टोला दीपक ठाकूर यांनी लगावला.
 हार्बर रेल्वे चा विस्तार कधी होणार याकडे गेली अनेक महिने तमाम गोरेगाव करांचे लक्ष लागले होते.येथील हार्बर रेल्वेच्या फलाट क्रमांक 1 आणि 2 चे काम तर कधीच पूर्ण झाले होते.तर गेल्या 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी पहिली ट्रायल देखिल घेतली होती.आजच संध्याकाळी विधानसभेच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यामुळे त्यातच उद्याची महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना थोडी उसंत मिळाली आहे.या मार्गावर हार्बर रेल्वे सुरू होत नसल्यामुळे गोरेगावकरांमध्ये नाराजी होती.

Web Title: Shivsena-BJP political War News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.