“२०२४ ला शरद पवारांमुळे पंतप्रधानपदी मराठी नेतृत्वच बसणार, मग भाजप असो वा मविआ”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 05:16 PM2022-06-17T17:16:20+5:302022-06-17T17:17:33+5:30

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनी नकार दिला असला तरी कित्येक दलांचे पक्षप्रमुख आजही त्यांच्या संपर्कात आहेत, असे शिवसेना नेत्याने म्हटले आहे.

shiv sena deepali sayed claims that marathi leadership will be the prime minister in 2024 | “२०२४ ला शरद पवारांमुळे पंतप्रधानपदी मराठी नेतृत्वच बसणार, मग भाजप असो वा मविआ”

“२०२४ ला शरद पवारांमुळे पंतप्रधानपदी मराठी नेतृत्वच बसणार, मग भाजप असो वा मविआ”

Next

मुंबई: राज्यातील विधान परिषद निवडणुकीसह देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. यानंतर महाविकास आघाडी सतर्क झाली असून, विधान परिषदेच्या निवडणुकीत याचा वचपा काढण्यासाठी रणनीति आखली जात आहे. यातच देशभरातील विरोधकांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शरद पवार यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. यातच राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची जोरदार चर्चा झाल्यानंतर आता २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी मराठी व्यक्तीच बसेल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेसकडूनही उमेदवार उभा केला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. आता नव्या राष्ट्रपतींची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. ममता बॅनर्जींनी सांगितले की, शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार असतील, तर सर्व विरोधी पक्षाचे यावर एकमत आहे. पण पवारांनी नकार दिल्याने आता नव्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. यानंतर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी २०२४ मध्ये पंतप्रधानपदी मराठी माणूस बसेल, असे म्हटले आहे. 

२०२४ ला शरद पवारांमुळे पंतप्रधानपदी मराठी नेतृत्वच बसणार

दीपाली सय्यद यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांनी नकार दिला असला तरी कित्येक दलांचे पक्षप्रमुख आजही त्यांच्या संपर्कात आहेत. शरद पवार यांच्यामुळे पंतप्रधान पदावर २०२४ मध्ये मराठी नेतृत्वच बसणार मग पक्ष भाजपा असो या मविआ. जय महाराष्ट्र, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे, शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जर ते हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी जे बहुमत लागते ते नाही आहे. शरद पवार या निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर अनेक राज्यातून मतदान झाले असते. भाजपची मदार खासदारांच्या मतांवर आहे आणि त्यांचे मूल्य सर्वाधिक असते. भाजप फारतर १०० मतांनी पुढे असेल त्यामुळे सामना बरोबरीचा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलेय.
 

Web Title: shiv sena deepali sayed claims that marathi leadership will be the prime minister in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.