ICSE साठी हटून बसलेली 'शारदाश्रम' शाळा नमली, SSC बोर्डाचे प्रवेश सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 12:31 PM2018-05-08T12:31:54+5:302018-05-08T12:31:54+5:30

पालक व राजकीय पक्षांच्या विरोधानंतर शाळा प्रशासनाने नमतं घेतलं आहे.

Shardashram School started admission process for SSC Students | ICSE साठी हटून बसलेली 'शारदाश्रम' शाळा नमली, SSC बोर्डाचे प्रवेश सुरू

ICSE साठी हटून बसलेली 'शारदाश्रम' शाळा नमली, SSC बोर्डाचे प्रवेश सुरू

Next

मुंबई- दादर पूर्वेमधील शारदाश्रम या शाळेतील इंग्रजी माध्यमाचा राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम बंद करून, तो आयसीएसई बोर्डात रूपांतरित करण्याचा घाट शाळेच्या व्यवस्थापनाने घातला होता. पण आता पालक व राजकीय पक्षांच्या विरोधानंतर शाळा प्रशासनाने नमतं घेतलं आहे. शारदाश्रम शाळेने बंद केलेले एसएससी बोर्डाचे प्रवेश पुन्हा सुरू केले आहेत. 10 मे पर्यंत एसएससी बोर्डासाठीच्या प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहेत.

चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा, यासाठी व्यवस्थापन दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकांनी केला होत्या. या संदर्भात पालकांनी शिक्षण संघटनांकडे तक्रारीदेखील केल्या. शाळेचे व्यवस्थापन शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांकडे ना हरकत प्रमाणपत्र मागतली.  मात्र, अनेक पालकांनी आयसीएसई बोर्डात पाल्याला प्रवेश घेऊन देण्यास विरोध दर्शविला. 

दरम्यान शारदाश्रम विद्यामंदिर या विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या पहिली ते चौथीच्या १२ वर्ग तुकड्यांना पालिकेने मे २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

 

Web Title: Shardashram School started admission process for SSC Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.