शरद पवार गोंधळलेले नेते : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:09 AM2019-03-20T06:09:00+5:302019-03-20T06:09:14+5:30

शरद पवार गोंधळलेले आहेत. ते संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवरूनही ते असेच बोलत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

Sharad Pawar Confused Leader: Chief Minister | शरद पवार गोंधळलेले नेते : मुख्यमंत्री

शरद पवार गोंधळलेले नेते : मुख्यमंत्री

Next

विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार गोंधळलेले आहेत. ते संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवरूनही ते असेच बोलत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
भाजपाच्या निवडणूक वॉर रुमचे उद्घाटन प्रदेश कार्यालयात फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी सीमापार सर्जिकल स्ट्राईक झाले हे जगाला माहिती आहे. पाकिस्तानवर आलेला आंतरराष्ट्रीय दबावही सर्वांनी पाहिला आहे. पण हे मान्य केले तर खंबीर नेतृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय मिळेल. त्यामुळे पवार यांचा गोंधळ उडाल्याचे दिसते.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन व्हावे, अशी देशभरच्या जनतेचे मानसिकता असून महायुतीला गेल्यावेळपेक्षाही विक्रमी यश मिळेल. विविध पक्षांतील प्रभावी नेते भाजपामध्ये येत आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाविषयी विचारले असता, ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आणखी नेते लवकरच भाजपात येतील, असे संकेत दिले.

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले नाराज नाहीत. ते युतीसोबतच
आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही त्यांना जागा देऊ शकलो नाही पण विधानसभेत सन्मानाने जागा
देऊ. २४ तारखेच्या युतीच्या पहिल्या सभेला ते उपस्थित राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Sharad Pawar Confused Leader: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.