गृहनिर्माणमधील संधी, आव्हानांवर रंगणार चर्चासत्र; ‘लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४’ आज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 09:29 AM2024-03-01T09:29:21+5:302024-03-01T09:29:35+5:30

गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत नामांकित बिल्डरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Seminar on Opportunities, Challenges in Housing; 'Lokmat Real Estate Conclave 2024' today | गृहनिर्माणमधील संधी, आव्हानांवर रंगणार चर्चासत्र; ‘लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४’ आज

गृहनिर्माणमधील संधी, आव्हानांवर रंगणार चर्चासत्र; ‘लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४’ आज

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील गृहनिर्माण क्षेत्राचा वाढता पसारा पाहता घरांच्या किमती, सर्वसामान्यांसाठीची परवडणारी घरे, कच्च्या मालाच्या किमतींसह गृहनिर्माण क्षेत्रातील संधी आणि आव्हानांवर प्रदीर्घ चर्चा करण्याकरिता लोकमत आणि रुस्तोगी इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. १ मार्च रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ दरम्यान हा कार्यक्रम कफ परेड येथील ताज प्रेसिडेंटमध्ये होणार आहे.

‘लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४’ मध्ये विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, लोकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महारेराचे अध्यक्ष अजय मेहता, मुंबई क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल, ठाणे क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, नॅरेडकोचे अध्यक्ष प्रशांत शर्मा आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. बोरगावकर ग्रुप आणि रिजन्सी इस्पात हे या कार्यक्रमाचे को-प्रेझेंटर आहेत. तर असोसिएट पार्टनर रुस्तुमजी, व्हर्सेटाईल हाऊसिंग हे आहेत. नॉलेज पार्टनर सॉलिसिस लेक्स आहेत.

  गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत नामांकित बिल्डरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. व्यासपीठावरील मान्यवरांच्या भाषणांसोबतच संवादादरम्यान उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना मान्यवरांकडून उत्तरे मिळतील. 
  या कार्यक्रमाच्या निमित्ताने गृहनिर्माण क्षेत्र, राज्य सरकार यांच्यातील संवाददुआ म्हणून ‘लोकमत’ काम करणार आहे. तर कार्यक्रमाद्वारे हाऊसिंग इंडस्ट्रीमधील विविध मुद्यांवर दृष्टिक्षेप टाकला जाणार असल्याने सरकारचेही त्याकडे लक्ष वेधले जाईल, असा विश्वास गृहनिर्माण क्षेत्राने व्यक्त केला आहे.

Web Title: Seminar on Opportunities, Challenges in Housing; 'Lokmat Real Estate Conclave 2024' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.