विमान प्रवाशांना २ कोटी ९८ लाखांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 03:06 AM2019-06-30T03:06:20+5:302019-06-30T03:06:58+5:30

विमान प्रवासामध्ये काही प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी या विरोधात संबंधित हवाई वाहतूक कंपनीविरोधात तक्रार दाखल केली व न्याय मिळावा, अशी मागणी केली.

Rs 2 crore 98 lakhs compensation to passengers | विमान प्रवाशांना २ कोटी ९८ लाखांची भरपाई

विमान प्रवाशांना २ कोटी ९८ लाखांची भरपाई

Next

- खलील गिरकर

मुंबई : मे महिन्यात देशांतर्गत हवाई प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत हवाई वाहतूक कंपन्यांद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध सोयी व नुकसानभरपाईवर २ कोटी ९८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. विमानात प्रवेश नाकारण्याच्या प्रकरणात ३,३५१ प्रवाशांना १ कोटी ३२ लाख ८९ हजार खर्च करण्यात आले.
विमान प्रवासामध्ये काही प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी या विरोधात संबंधित हवाई वाहतूक कंपनीविरोधात तक्रार दाखल केली व न्याय मिळावा, अशी मागणी केली. मे महिन्यात अशा प्रकारे ७४६ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी ६६९ तक्रारींचे निरसन करण्यात यश आले, तर ७७ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. सर्वात जास्त २८४ तक्रारी एअर इंडियाच्या सेवेबाबत नोंदविण्यात आल्या. त्यापैकी २०७ तक्रारी सोडविण्यात आल्या, तर ७७ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. इंडिगोच्या सेवेबाबत २६८ तक्रारी, स्पाइसजेटच्या सेवेबाबत १०१, गो एअरबाबत ६६, विस्ताराबाबत १३, एअर एशियाबाबत ११ तर ट्रु जेटबाबत ३ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. एअर इंडिया वगळता इतर कंपन्यांबाबत नोंदविण्यात आलेल्या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात आले. विमान सेवेसंदर्भातील तक्रारींचे प्रमाण दर १० हजार प्रवाशांमागे ०.६१ टक्के इतके आहे.
विमानात प्रवेश नाकारण्यामध्येही सर्वात जास्त २,५६३ प्रवासी एअर इंडियाचेच आहेत. त्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा, दुसºया विमानाचेतिकीट उपलब्ध करून देणे, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करणे अशा सुविधांवर कंपनीला १ कोटी १४ लाख ५२ हजार रुपये खर्च करावे लागले. विमानाला विलंब झाल्याचा सर्वात जास्त फटका स्पाइसजेटच्या ४३ हजार ४५० प्रवाशांना बसला. त्यांना पुरविलेल्या सुुविधांवर कंपनीला ६९ लाख ७१ हजार खर्च करावे लागले. विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचा सर्वाधिक फटकादेखील स्पाइसजेटच्या ६,७३२ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविलेल्या सुविधांवर कंपनीने नुकसानभरपाई म्हणून २७ लाख ७८ हजार रुपये खर्च केले आहेत.

उड्डाण रद्द झाल्याचा १५,९४८ प्रवाशांना फटका
विमान उड्डाण रद्द होण्याच्या घटनांचा फटका १५ हजार ९४८ प्रवाशांना बसला. त्यामध्ये विविध सोईसुविधा व नुकसानभरपाईसाठी ४७ लाख ४६ हजार खर्च करावे लागले. उड्डाणाला विलंब होण्याच्या विविध प्रकरणांमुळे तब्बल १ लाख २१ हजार ३८१ प्रवाशांना त्रास झाला. त्यांना पुरविलेल्या विविध सुविधांसाठी १ कोटी १८ लाख ४५ हजार रुपये एवढा खर्च विमान कंपन्यांना करावा लागला. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या अहवालात याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Rs 2 crore 98 lakhs compensation to passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान