छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा शासकीय इमारतींवर अनिवार्य करणार - डॉ. परिणय फुके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 01:35 AM2019-07-04T01:35:21+5:302019-07-04T01:35:42+5:30

बुधवारी मंत्रालयात राज्यमंत्री डॉ. फुके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली.

Rooftop rainwater harvesting system will make government buildings compulsory - Dr. Convulsions | छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा शासकीय इमारतींवर अनिवार्य करणार - डॉ. परिणय फुके

छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा शासकीय इमारतींवर अनिवार्य करणार - डॉ. परिणय फुके

googlenewsNext

मुंबई : पुढील काळात सर्व शासकीय इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा (रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम) अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.
बुधवारी मंत्रालयात राज्यमंत्री डॉ. फुके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली.
सध्या बांधकाम होत असलेल्या आणि गेल्या पाच वर्षांत बांधल्या गेलेल्या शासकीय इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात येईल. राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप, ४८ तासांत खड्डे बुजविण्यात यावेत यासाठी कंपनीला सूचना देण्यात येणार आहे.

निविदा कालावधी ७ दिवसांचा
सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे अधिक वेगवान होण्यासाठी निविदा कालावधी ७ दिवसांचा करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. फुके यांनी दिली.

Web Title: Rooftop rainwater harvesting system will make government buildings compulsory - Dr. Convulsions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस