रोह्यात लिपिकाला लाच घेताना अटक
By Admin | Updated: April 10, 2015 00:09 IST2015-04-10T00:09:29+5:302015-04-10T00:09:29+5:30
तहसील कार्यालयातील लिपिक व्ही.एस. दुपारगडे यांनी चॅप्टर केस मिटविण्यासाठी २००० रुपयांची मागणी केली होती. याबाबत राजेश नंदकुमार

रोह्यात लिपिकाला लाच घेताना अटक
रोहा : तहसील कार्यालयातील लिपिक व्ही.एस. दुपारगडे यांनी चॅप्टर केस मिटविण्यासाठी २००० रुपयांची मागणी केली होती. याबाबत राजेश नंदकुमार भालेकर (रा. मढाली खुर्द ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लिपिक व्ही.एस. दुपारगडे याला गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
मढाली येथील राजेश नंदकुमार भालेकर यांच्या भावाविरुद्ध विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार रोहा यांच्या कोर्टात चॅप्टर केस चालू होती. सदर केस मिटविण्याकरिता लिपिक व्ही.एस. दुपारगडे यांनी २००० रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून १५०० रुपयांची लाच स्वीकारताना दुपारगडे यांना पंच व साक्षीदार यांच्या समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी दुपारगडे यांची चौकशी चालू असून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम चालू आहे. (वार्ताहर)