नाणार विरोधात शिवसेना आक्रमक, कोकणातील चाकरमान्यांकडून प्रकल्पाविरोधातील स्टिकर्स व मिस कॉल मोहिमेला प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 09:13 PM2018-05-02T21:13:29+5:302018-05-02T21:13:29+5:30

कोकणातील नाणार रिफायनी विरोधात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.नाणार विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी त्यांच्या वाहनांवर लावण्यात येणाऱ्या स्टिकर व मिस कॉल मोहिमेला प्रतिसाद  मिळत असल्याचे चित्र आहे. 

responds to the stickers and miss call campaign against the Nanar project | नाणार विरोधात शिवसेना आक्रमक, कोकणातील चाकरमान्यांकडून प्रकल्पाविरोधातील स्टिकर्स व मिस कॉल मोहिमेला प्रतिसाद 

नाणार विरोधात शिवसेना आक्रमक, कोकणातील चाकरमान्यांकडून प्रकल्पाविरोधातील स्टिकर्स व मिस कॉल मोहिमेला प्रतिसाद 

- मनोहर कुंभेजकर 
मुंबई -  कोकणातील नाणार रिफायनी विरोधात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.नाणार विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी त्यांच्या वाहनांवर लावण्यात येणाऱ्या स्टिकर व मिस कॉल मोहिमेला  प्रतिसाद  मिळत असल्याचे चित्र आहे. 
उन्हाळयाच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी  शिवसेनेचा नाणार राहणार ..प्रकल्प जाणार या उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाचा हा आवाज मोठ्या प्रमाणात कोकणवासियांपर्यंत पोहचवण्यासाठी विलेपार्ले येथील शिवसैनिक जितेंद्र जनावळे यांनी खास  वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर तयार केले असून कोकणातील प्रत्येक कोकणवासीयांनी रिफायनरी प्रकल्पाला  विरोध करण्यासाठी  शिवसेनेचे  स्टिकर वाहनांना लावूनच कोकणात जावे असे आवाहन वाहनधारकांना करण्यात येत आहे.यासाठी वाशी आणि पळस्पे टोल नाका येथे उन्हाळयाच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी त्यांच्या गाड्यांवर जनावळे व त्यांचे 25 ते 30 शिवसैनिक नाणार प्रकल्पाला प्रखर विरोध दर्शवणारे स्टिकर लावत आहेत. आतापर्यंत सुमारे 2000 वाहनांवर स्टिकर लावण्यात आले असून 5000 स्टिकर्स कोकणात पाठवण्यात आले असून कोकणवासीयांनी सुद्धा आपल्या वाहनांवर स्टिकर्स लावले आहेत. 
  9820259778 या त्यांच्या मोबाईल कॉलवर आजपर्यंत 5000 हून अधिक मिस कॉल आले असून त्यांनी देखिल उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.लवकरच हा सर्व डेटा एकत्र करून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तो पाठवणार असून नाणार रिफायनरीच्या विरोधात कोकणवासियांच्या भावना तीव्र असून हा प्रकल्प कोकणवासियांवर लादू नये अशी मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे जनावळे यांनी सांगितले. 
कोकणात जाणाऱ्या  प्रवाश्यानी ज्यांना कोकणच्या वैभवाची काळजी आहे त्यांनी हे स्टिकर आमच्याकडून  मोफत घेऊन जावे किंवा त्यांनी आपले नाव नोंदवा किंवा संपर्क  साधा आपल्याला स्टिकर्स घरपोच मिळतील असे आवाहन त्यांनी कोकणवासियांना शेवटी केले आहे.

Web Title: responds to the stickers and miss call campaign against the Nanar project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.